नवी दिल्ली : जम्मू काश्मीरच्या नियंत्रण रेखा म्हणजे LoC वर पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात तीन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याविरोधात भारताने कडाडून विरोध केला आहे. भारताने पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांना समन दिला आहे. जम्मू काश्मीरच्या कृष्णाघाटी सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या संघर्षविराम उल्लंघनात एका लहान मुलासह तीन निर्दोष नागरिकांची हत्या झाली आहे. याचा त्यांनी कडाडून विरोध केली आहे.
भारतीय विदेश मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. मंत्रालयने सांगितलं की, शुक्रवारी रात्री पाकिस्तानने केलेल्या या कृतीला भारताकडून कडाडून विरोध केला आहे. या घटनेत एका मुलासह तीन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. विदेश मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या निशाणावर असलेले हे सारे जण एकाच कुटुंबातील आहे.
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, विदेश मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान सशस्त्र दलांनी जाणून बुजून निर्दोष नागरिकांना आपल्या निशाण्यावर घेतलं आहे. याबाबत भारताने कडाडून विरोध केला आहे. यावर्षी पाकिस्ताने २७११ हून अधिक वेळा सीजफायरचं उल्लंघन केलं आहे. यामध्ये २१ भारतीयांचा मृत्यू झाला आहे तर ९४ लोकं जखमी झाले आहेत.