Airstrike : पाकिस्तानमध्ये हल्ला केल्यानंतर भारतीय लष्कराचं सूचक ट्विट

याचा अर्थ असा समजू नका की..... 

Updated: Feb 26, 2019, 10:42 AM IST
Airstrike : पाकिस्तानमध्ये हल्ला केल्यानंतर भारतीय लष्कराचं सूचक ट्विट title=

नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्याचं उत्तर देत भारतीय वायुदलाने मंगळवारी म्हणजे २६ फेब्रुवारीला पाकव्याप्त काश्मीरमध्ये जात दहशतवादी तळांचा नायनाट केला. वायुदलाच्या मिराज २००० या लढाऊ विमानांच्या सहाय्याने पाकिस्तानात जात पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमाराल भारतीय वायुदलाकडून ही कारवाई करण्यात आली. वायुदलाचा सहभाग असणाऱ्या या कारवाईत पाकिस्तान नियंत्रण रेषेनजीक असणाऱ्या दहशतवादी तळांचा नायनाट करत दहशतवादाला जशात तसं उत्तर देण्यात आलं.

वायुदलाच्या या कारवाईनंतर अवघ्या काही क्षणांमध्ये देशभरातून अनेकांनीच या कारवाईचं स्वागत केलं. भारतीय लष्कराच्या ट्विटर अकाऊंटवरुनही एका लक्षवेधी पोस्टवर यावेळी नेटकऱ्यांच्या नजरा खिळल्या होत्या. एका काव्याचा आधार घेत हे ट्विट करण्यात आलं. 

'क्षमाशील हो रिपु-समक्ष
तुम हुए विनीत जितना ही,
दुष्ट कौरवों ने तुमको
कायर समझा उतना ही।
सच पूछो, तो शर में ही
बसती है दीप्ति विनय की,
सन्धि-वचन संपूज्य उसी का जिसमें शक्ति विजय की।'

या काव्यपंक्ती पोस्ट लष्कराच्या अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आल्या. #TuesdayThought अशा हॅशटॅगसह ही पोस्ट सर्वांच्या भेटीला आली. ज्यामध्ये #IndianArmy #AlwaysReady असे हॅशटॅगही वापरण्यात आले आहेत. 

Live Updates : भारतीय वायुदलाने LOC ओलांडली, पाकिस्तानी दहशतवादी तळांचा नायनाट  

आम्ही क्षमाशील आहोत, विनम्र आहोत याचा अर्थ असा होत नाही की आम्ही अतिसहनशील आहोत किंवा उत्तरच देऊ शकत नाही, असा या ओळींचा अर्थ होत अस असून हा एक प्रकारे पाकिस्तानला देण्यात आलेला इशाराच असल्याचं स्पष्ट होत आहे. दरम्यान, वायुदलाच्या या कारवाईचं लष्कराकडून आणि साऱ्या देशाकडून कौतुक करण्यात येत आहे.