Extra Marital Affair : तुम्हाला बायकोने गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं तर कायदा काय सांगतो

तुम्हाला तुमच्या बायकाने रंगेहाथ पकडलं तर तम्हाला अटक होऊ शकते की नाही?,  जाणून घ्या 

Updated: Sep 26, 2022, 06:01 PM IST
Extra Marital Affair : तुम्हाला बायकोने गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं तर कायदा काय सांगतो   title=

indian constitution and laws regarding extra marital affair: लग्न झाल्यावरही अनेकांचे बाहेर अफेर सुरू असतात. जेव्हा पत्नीला संशय येतो आणि काही दिवसांनी या अफेरचा भांडाफोड झाल्यानंतर संसार मोडल्याची अनेक प्रकरणं आपण पाहिली आहेत. पतीच्या बाहेर सुरू असलेल्या अफेरची महिती झाल्यावर पोलिसात जाण्याची धमकी देण्याची प्रकरणंही आपण पाहिली आहेत. मात्र (extra marital affair) असल्याने खरच तुमच्यावर गुन्हा दाखल होतो का?, याबाबत कायदा काय सांगतो. याबाबत जाणून घ्या सविस्तर. (indian constitution and laws regarding extra marital affair)
  
extra marital affair असणं गुन्हा आहे का? 
एखाद्या पतीचं लग्नानंतर बाहेर दुसऱ्या महिलेसोबत अफेर सुरू असेल तर तो गुन्हा ठरत नाही. तुम्हाला पत्नीने रंगेहाथ पकडलं तरी त्यावेळी पोलीसही (police) तुमच्यावर कोणताही (Criminal Offence) फौजदारी गुन्हा दाखल करू शकत नाही. मात्र या कारणावरून तुमची पत्नी तुम्हाला घटस्फोट देऊन विभक्त होण्याचा निर्णय घेऊ शकते. अशाच प्रकरणासंबंधात सर्वोच्च न्यायालयाने 2018 साली विवाहबाह्य संबंधाबाबत ऐतिहासिक निकाल दिला होता.

सर्वोच्च न्यायालयाने काय दिला होता निकाल? 
न्यायालयाने आपल्या निकालामध्ये, 158 वर्षांपूर्वीचं भारतीय दंड संहितेतील कलम 497 अवैध ठरवलं होतं. (extra marital affair) विवाहबाह्य संबंध असणं हा काही गुन्हा नाही, असं म्हटलं होतं. पुरूष आणि स्त्री हे दोन्ही समान असून पती हा पत्नीचा मालक होऊ शकत नाही, असंही न्यायालयाने सुनावणीवेळी म्हटलं होतं. 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ASHISH DAWAR (@iamlegalbaba)

विवाहबाह्य संबंधांना इंग्लिशमध्ये 'अडल्ट्री' असं म्हटलं जातं. पुरूष किंवा पत्नी त्यांचं लग्न झालेलं असतानाही बाहेर पती दुसऱ्या महिलेसोबत किंवा पत्नी दुसऱ्या परपुरूषासोबत संबंध ठेवते. याला extra marital affair असं म्हणतात.