मुंबई : तुम्हाला हे माहितच असेल की, भारतीय रेल्वेने लांबचा प्रवास करण्यासाठी आपल्याला काही महिने अगोदर रेल्वेचं तिकीट काढावं लागतं. ज्यामुळे तुम्हाल कन्फर्म तिकीत मिळतं. परंतप जेव्हा आपल्याला कन्फर्म तिकीत मिळत नाही तेव्हा आपल्याला तत्काळ आणि एजंटच्या माध्यमातून जावे लागते. ज्यामुळे आपल्या तिकीत मिळते. परंतु आता हा त्रास संपला आहे, आता तुम्हाला ते करण्याची गरज नाही. जर ट्रेनमध्ये कोणतीही बर्थ रिकामी असेल किंवा रिकामी होणार असेल, तर तुम्हाला लगेच त्याची माहिती मिळेल आणि तुम्ही लगेच त्या सिटसाठी तिकीट बुक करू शकता.
परंतु हे कसं शक्य आहे? तर IRCTCने त्यांच्या सेवेत काही बदल केले आहेत, तर त्यांच्या या नवीन सेवेबद्दल जाणून घ्या.
जेव्हा तुम्ही IRCTC च्या वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन तिकीट बुक करता, तेव्हा तुम्ही सर्व गाड्यांमध्ये सीटची उपलब्धता पाहू शकता. जर सीट रिकामी असेल तर तुम्ही त्याला बुक करा आणि जर ती रिक्त नसेल तर तुम्हाला वाटत असल्या तिकीट घ्या, जर नशीब चांगलं असेल तर काही वेळाने तिकीट कन्फर्म होईल किंवा तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता कमी वाटत असेल, तर तुम्ही तिकीट बुक करु नका.
खरेतर आत्तापर्यंत IRCTCची अशी कोणतीही सुविधा नव्हती की, जर ट्रेनमध्ये कोणतीही सीट रिक्त असेल तर ते प्रवाशांना कळू शकेल. परंतु आता IRCTC आपल्या प्रवाशांना ही सुविधा देत आहे.
इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने पुश नोटिफिकेशनची सुविधा सुरू केली आहे. यामुळे, प्रवाशांना रेल्वेमधील सीट उपलब्धतेसह अनेक प्रकारच्या सुविधांची माहिती मिळू शकेल. आयआरसीटीसीने अलीकडेच आपली वेबसाइट अपडेट केली आहे, ज्यामध्ये अनेक नवीन फीचर देखील जोडले गेले आहेत.
जेव्हाही ट्रेनमध्ये सीट रिक्त असेल तेव्हा त्याची सूचना वापरकर्त्यांच्या मोबाइलवर जाईल. वापरकर्ते नंतर त्यांच्या सोयीनुसार रिक्त सीट बुक करू शकतात. परंतु यासाठी वापरकर्त्याला प्रथम IRCTC च्या वेबसाईटवर जाऊन पुश नोटिफिकेशनची सुविधा घ्यावी लागेल.
समजा तुम्ही एखाद्या विशिष्ट तारखेसाठी ट्रेनमध्ये सीट बुक करत असाल, पण तुम्हाला ट्रेनमध्ये कोणतेही सीट उपलब्ध दिसत नाही, तर तुम्ही तिकीट बुक करणार नाही. यानंतर, आपण सर्व ट्रेनमध्ये तिकिटांची उपलब्धता तपासली आहे. जर एखाद्या प्रवाशाने त्याचे तिकीट रद्द केले, तर आपल्या मोबाइलवर एक एसएमएस येईल, ज्यावर एक सूचना असेल. या मध्ये ट्रेनच्या क्रमांकाची माहितीही असेल, त्यानंतर तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हे तिकीट त्वरित बुक करून प्रवास करू शकता.
जेव्हा तुम्ही IRCTC वेबसाईट उघडता तेव्हा तुम्हाला पुश नोटिफिकेशनचा पर्याय मिळतो. ग्राहक या विशेष सेवेची पूर्णपणे मोफत सदस्यता घेऊ शकतात. यासाठी त्यांना IRCTC च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन नोंदणी करावी लागेल आणि या सेवेची सदस्यता घ्यावी लागेल. IRCTC चे सध्या 30 दशलक्षाहून अधिक वापरकर्ते आहेत.