Indian Railways Rules : लांबपल्याचा प्रवास करताना बहुतांश लोक रेल्वेला पसंती देतात. तुम्हीही सहसा ट्रेनमधून प्रवास करत असाल तर तुम्हाला रेल्वेशी संबंधित नियम माहित असले पाहिजेत. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन रेल्वेकडून (Indian Railway) अनेक नियम केले जातात. रेल्वेशी संबंधित असा नियम जाणून घ्या, ज्यामुळे तुमचा रात्रीचा प्रवास अधिक आरामदायी होईल.
थ्री टायर कोचमध्ये आहे हा नियम
थर्ड एसी कोच किंवा स्लीपर कोचमध्ये प्रवास करताना सर्वात मोठी समस्या मधल्या बर्थची असते. अनेकदा खालच्या बर्थचा प्रवासी रात्री उशिरापर्यंत सीटवर बसून राहतो, त्यामुळे मधल्या बर्थच्या प्रवाशाला इच्छा असूनही आराम करता येत नाही. अनेक वेळा असे देखील होते की मधल्या बर्थचे प्रवासी रात्री उशिरापर्यंत खालच्या बर्थवर बसतात, त्यामुळे खालच्या बर्थवर झोपायला त्रास होतो.
मधला बर्थ उघडण्याची आणि बंद होण्याची वेळ
जर तुमच्यासोबत कधी असं झालं असेल तर तुम्हाला रेल्वेच्या नियमांची माहिती घ्यावी. रेल्वेच्या नियमांनुसार तुम्ही रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत मधला बर्थ उघडू शकता. म्हणजेच, जर तुमच्याकडे लोअर बर्थ असेल, तर रात्री 10 वाजल्यानंतर मिडल बर्थ किंवा अप्पर बर्थचा प्रवासी तुमच्या सीटवर बसू शकत नाही. तुम्ही रेल्वेच्या नियमांचा संदर्भ घेऊन तुमची सीट रिकामी करण्यास सांगू शकता. याशिवाय, मिडल बर्थ असलेल्या प्रवाशाने दिवसा त्याची सीट उघडली तरीही तुम्ही त्याला रेल्वेचे नियम सांगू शकता.
टीटीई तिकीटही तपासू शकत नाही
प्रवासी अनेकदा तक्रार करतात की झोपल्यानंतर ते टीटीई कोचमध्ये तिकीट तपासण्यासाठी येताता आणि प्रवाशांना जागे करतात. यामुळे प्रवाशांची झोपमोड होते आणि त्रास होतो. प्रवाशांचा हा त्रास दूर करण्यासाठी आणि प्रवास सुकर करण्यासाठी रेल्वेच्या नियमांनुसार रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत टीटी प्रवाशांच्या झोपेच्या वेळी तिकीट तपासू शकत नाही. पण जर तुमचा प्रवास रात्री 10 नंतर सुरू झाला तर हा रेल्वे नियम लागू होत नाही.
मोठ्याने बोलण्यावर बंदी
रात्रीच्या वेळी सहप्रवाशांद्वारे मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी ऐकणे किंवा व्हिडिओ पाहणे अशा तक्रारी प्रवाशांकडून रेल्वे बोर्डाकडे येतात. त्यामुळे रेल्वेने 10 वाजल्यानंतर इअरफोनशिवाय गाणी ऐकण्यास, व्हिडिओ पाहण्यास किंवा मोठ्याने बोलण्यास बंदी घातली आहे.
रेल्वे कर्मचाऱ्यांची जबाबदारी
जर तुमचा सहप्रवासी तुमचे ऐकत नसेल तर तुम्ही यासाठी ट्रेनमध्ये उपस्थित असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांकडे तक्रार करू शकता. घटनास्थळी येऊन तुमची समस्या सोडवण्याची जबाबदारी रेल्वे कर्मचाऱ्यांची आहे. त्यानंतरही सहप्रवासी सहमत नसेल, तर त्याच्यावर रेल्वेच्या नियमानुसार कारवाई होऊ शकते.