फक्त 4 दिवस काम आणि 3 दिवस आराम, सर्वांना याच भारतीय कंपनीत हवी नोकरी!

4 Day Work Week: अशीदेखील एक कंपनी आहे जी आपल्या कर्मचाऱ्यांना आठवड्याला दोनपेक्षा जास्त सुट्ट्या देते. त्यामुळे प्रत्येकाला या कंपनीत नोकरी करण्याची इच्छा आहे. कोणती आहे ही कंपनी? काय आहेत या कंपनीच्या अटी? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

Pravin Dabholkar | Updated: Oct 11, 2023, 04:39 PM IST
फक्त 4 दिवस काम आणि 3 दिवस आराम, सर्वांना याच भारतीय कंपनीत हवी नोकरी!  title=

4 Day Work Week: बहुतांश कंपन्यांमध्ये आठवड्याला 1 दिवस सुट्टी असते तर अनेक ठिकाणी 5 दिवसांचा आठवडा आणि 2 दिवस सुट्ट्या असतात. पण एका आठवड्याला याहीपेक्षा जास्त सुट्ट्या मिळाल्या तर? हो. अशीदेखील एक कंपनी आहे, जी आपल्या कर्मचाऱ्यांना आठवड्याला दोनपेक्षा जास्त सुट्ट्या देते. त्यामुळे प्रत्येकाला या कंपनीत नोकरी करण्याची इच्छा आहे. कोणती आहे ही कंपनी? काय आहेत या कंपनीच्या अटी? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

कर्मचाऱ्यांनी आपले वार्षिक उद्दिष्ट लवकर पूर्ण केल्यास त्यांना उर्वरित वर्षभर 4 दिवसांच्या कामाच्या आठवड्याचा आनंद घेऊ शकेल असे कंपनीने जाहीर केले आहे. नवीन हायपर-पर्सनलाइज्ड पॉलिसी रँडस्टॅड इंडिया या कंपनीने हे निर्देश दिले आहेत. टिम्सना त्यांचे वार्षिक लक्ष्य त्वरीत साध्य करण्यासाठी प्रोत्साहन देणे हा यामागचा उद्देश आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या जीवनाचा अधिक चांगला आनंद घेण्यासाठी फ्लेक्सिबिलिटी मिळते,असेही स्पष्ट करण्यात आले. 

आठवड्यातून 4 दिवस काम 

आठवड्यांतून 4-दिवसांचे वेळापत्रक कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. यानुसार कर्मचारी नेहमीप्रमाणे 5 किंवा 6 दिवसांऐवजी आठवड्यातून 4 दिवस काम करतील. असे असले तरी कर्मचाऱ्यांच्या कामाचा ताण तसाच राहील. 
आमच्या क्षेत्रात उद्योगांमध्ये जलद आणि अप्रत्याशित बदल घडत असतात. अशावेळी संस्थांनी त्यांच्या महत्त्वाकांक्षा साध्य करण्यासाठी दूरदृष्टी आणि स्पष्टतेने नेतृत्व करणे महत्त्वाचे बनले असल्याचे रँडस्टॅड इंडियाच्या मुख्य लोक अधिकारी अंजली रघुवंशी म्हणाल्या. आजच्या वैविध्यपूर्ण आणि महत्त्वाकांक्षी कार्यबलाला व्यस्त ठेवण्यासाठी हायपर-पर्सनलाइज्ड पध्दती आणि पुढाकार आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

Railway Job: भारतीय रेल्वेत विविध पदांच्या 2.4 लाख जागा रिक्त, 'येथे' पाठवा अर्ज

कर्मचाऱ्यांना हवा 4-दिवसांच्या कामाचा आठवडा

'रँडस्टॅडमध्ये आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना वेगळा अनुभव देतो. 4 दिवसांचा कामाचा आठवडा असे धोरण ठेवल्याने कर्मचारीही आनंदात आहेत. कामाच्या ठिकाणी लवचिकतेच्या गरजेच्या वाढत असल्याचे 4-दिवसीय कामाच्या आठवड्याच्या संकल्पनेस गती मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे.

रँडस्टॅडने एक एम्प्लॉई पल्स सर्वेक्षण केले. त्यानुसार 5-दिवसांच्या कामाच्या आठवड्यात काम करणाऱ्या 83 टक्के लोकांनी 4-दिवसांच्या आठवड्यात जाण्यात स्वारस्य दाखवले आहे.  हा बदल उत्पादकता वाढविण्यात आणि तणाव पातळी कमी करण्यास मदत करेल, असा यातील बहुतेक प्रतिसादकर्त्यांना असा विश्वास आहे.

वयाच्या साठीत 10 कोटी रुपये हवेयत?, 'अशी' करा गुंतवणुकीची सुरुवात

बेरो ऑगस्ट 2017 पासून देतेय सुविधा

बेरो ही कंपनीदेखील आपल्या कर्मचाऱ्यांना 4-दिवस कामाचा आठवडा देते. ही एक जागतिक SaaS-बेस्ड प्रोक्योरमेंट इंटेलिजन्स आणि एनालिटिक्स कंपनी आहे. कंपनीचा भारतात बऱ्यापैकी विस्तार आहे. या कंपनीने ऑगस्ट 2017 पासून 4 दिवस कामाचा आठवडा लागू केला असून भारतातील कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांना लागू आहे.