इन्फोसिस पुढच्या दोन वर्षांत करणार ६,००० कर्मचाऱ्यांची भरती

इन्फोसिसमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुढच्या दोन वर्षांमध्ये इन्फोसिस तब्बल ६००० कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. गेल्या आर्थिक वर्षातही इन्फोसिसने इतक्याच कर्मचाऱ्यांची भर्ती केली होती.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Sep 11, 2017, 09:53 PM IST
इन्फोसिस पुढच्या दोन वर्षांत करणार ६,००० कर्मचाऱ्यांची भरती title=

नवी दिल्ली : इन्फोसिसमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुढच्या दोन वर्षांमध्ये इन्फोसिस तब्बल ६००० कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. गेल्या आर्थिक वर्षातही इन्फोसिसने इतक्याच कर्मचाऱ्यांची भर्ती केली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इन्फोसिसचे हंगामी सीईओ आणि प्रबंद निदेशक यू बी प्रवीण राव यांनी गेल्या आठवड्यात झालेल्या गुंतवणुकदारांच्या बैठकीत, आम्ही ६००० कर्मचाऱ्यांची भरती करणार असल्याचे म्हटले होते. पुढच्या दोन वर्षातही इतक्याच प्रमाणात भरती केली जाईल, असेही राव यांनी म्हटले होते. मात्र, बाजारात असलेल्य चढउतारानुसार हा निर्णय घेतला जाईल, असेही राव यांनी म्हटले होते.