Indian Railways Latest Service: तुम्हीही अनेकदा रात्रीच्या वेळी ट्रेनने प्रवास करत असाल तर ही बातमी वाचून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. रेल्वेकडून प्रवाशांच्या सुविधांमध्ये सातत्याने सुधारणा करण्यात येताात. आत्तापर्यंत रेल्वेने देशातील सर्व स्थानकांवर वाय-फाय, एस्केलेटरसह सर्व सुविधा सुरू केल्या आल्या आहेत. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन रेल्वे बोर्ड आपल्या सेवेत सातत्याने सुधारणा करत आहे. रेल्वेने आता सुरू केलेल्या सेवेचं सदस्यत्व घेतल्यास प्रवासादरम्यान तुम्हाला रात्रीही शांत झोपता येईल.
आता रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेने सर्वोत्तम सेवा सुरू केली आहे. ही सुविधा सुरू केल्यानंतर तुम्ही ट्रेनमध्ये शांतपणे झोपू शकाल. झोपेच्या वेळी तुम्हाला ज्या स्टेशनवर उतरायचं आहे ते स्टेशन चुकण्याची चिंता करण्याची गरज नाही. रेल्वेने सुरू केलेली ही सुविधा तुम्हाला स्टेशनवर येण्याच्या 20 मिनिटे आधी जागं करेल. यामुळे तुमचं स्टेशन चुकणार नाही आणि तुम्ही चांगली झोपू शकाल.
रेल्वेने सुरू केलेल्या या विशेष सेवेचं नाव 'डेस्टिनेशन अलर्ट वेक अप अलार्म' असं आहे. अनेक वेळा रेल्वे बोर्डाला ट्रेनमध्ये झोपलेल्या लोकांची माहिती मिळाली आहे. इतकंच नाही तर त्यामुळे त्याचं स्टेशनही अनेकदा चुकलं. आता या समस्येतून सुटका करण्यासाठी रेल्वेने ही सुविधा सुरू केली आहे. रेल्वेने 'चौकशी सेवा' क्रमांक 139 वर ही सेवा सुरू केली आहे.
या सेवेअंतर्गत प्रवास करणारे प्रवासी 139 क्रमांकाच्या चौकशी प्रणालीवर अलर्ट सुविधेसाठी विचारू शकतात. रात्री 11 ते सकाळी 7 या वेळेत उपलब्ध असलेल्या या सुविधेचा लाभ कोणीही घेऊ शकतो. याचा फायदा असा होईल की ही सेवा घेतल्यावर तुम्हाला स्टेशनवर येण्याच्या 20 मिनिटे आधी तुम्हाला जागं केलं जाईल. यासाठी तुम्हाला फक्त रु. 3 द्यावे लागतील.
तुम्ही ही सेवा घेतल्यावर, स्टेशनवर येण्याच्या २० मिनिटे आधी तुमच्या फोनवर अलर्ट पाठवला जाईल. जेणे करून तुम्ही तुमचं सामान वगैरे व्यवस्थित लावू शकाल आणि स्टेशनवर आल्यावर आरामात उतरू शकाल.
'डेस्टिनेशन अलर्ट वेकअप अलार्म' सुरू करण्यासाठी तुम्हाला IRCTC हेल्पलाइन 139 वर कॉल करावा लागेल. भाषा निवडल्यानंतर, तुम्हाला सर्वात आधी 7 क्रमांक दाबावा लागेल आणि नंतर इच्छित ठिकाणाच्या अलर्टसाठी 2 क्रमांक दाबावं लागेल. त्यानंतर तुमचा 10 अंकी PNR टाका. याची पुष्टी करण्यासाठी 1 डायल करा. असं केल्याने तुम्हाला स्टेशनवर येण्याच्या 20 मिनिटे आधी वेकअप अलर्ट मिळेल.