कन्फर्म सीटसाठी धावपळ कशाला? एका मिनिटात असं बुक करा तात्काळ तिकीट, स्टेप बाय स्टेप संपूर्ण प्रोसेस जाणून घ्या

IRCTC Tatkal Ticket Booking: ट्रेनचे कन्फर्म तिकीट मिळवण्यासाठी खूप धडपड करावी लागते. 

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 2, 2024, 12:11 PM IST
कन्फर्म सीटसाठी धावपळ कशाला? एका मिनिटात असं बुक करा तात्काळ तिकीट, स्टेप बाय स्टेप संपूर्ण प्रोसेस जाणून घ्या title=
IRCTC Tatkal Ticket Booking Use This Trick To Confirm Berth Instantly Step By Step Guide

IRCTC Tatkal Ticket Booking: ट्रेनमध्ये कन्फर्म तिकीट मिळणे कधीकधी खूप कठिण होऊन बसते. वेटिंग लिस्टमधील तिकिट कन्फर्म होण्यासाठी फार काळ वाट पाहावी लागते. अशावेळी तिकिट कन्फर्म होण्यासाठी तात्काळ तिकिट बुकिंग हा पर्याय कामाला येतो. भारतीय रेल्वेचे ऑनलाइन तिकिट प्लॅटफॉर्म IRCTCवर मिळणारे तात्काळ रिझर्व्हेशन सिस्टम त्या प्रवाशांसाठी खूप फायदेशीर आहे ज्यांना अगदी शेवटच्या क्षणी ट्रेनचे तिकिट बुक करावे लागते. 

तात्काळ तिकिट तुम्ही IRCTCची वेबसाइट किंवा मोबाइल अॅपवरुन बुक केले जाते. मात्र, कन्फर्म तिकिट मात्र नशीबाने मिळते. प्रवाशांची मागणी आणि उपलब्धता कमी असल्याने तात्काळ तिकिट मिळवण्यासाठी खूप आव्हाने पार पाडावी लागतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की IRCTCवर तात्काळ तिकिट बुक कसं कराल. स्टेप बाय स्टेप संपूर्ण प्रोसेस जाणून घ्या. 

सगळ्यात पहिले IRCTC Account सुरू करा

तात्काळ तिकिट बुक करण्यासाठी IRCTCवर अकाउंट असणे गरजेचे आहे. IRCTC.co.inवर एक तुमचं स्वतःचं अकाउंट रजिस्टर करा. त्यानंतर रजिस्ट्रेशनसाठी मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी टाका. आता IRCTC.co.in च्या होमपेजवर यूजर नेम आणि पासवर्ड टाकून लॉगइन करा. 

तुमची Journey प्लान करा

लॉगइन केल्यानंतर Plan My Journey या पेजवर जा. त्यानंतर डिपार्चर आणि अरायव्हल म्हणजेच From/to स्टेशन एंटर करा. त्यानंतर Date OF Journy टाकून बुकिंग टॅबमध्ये जा आणि तात्काळ हा पर्याय सिलेक्ट करा आणि सर्च करा. 

तात्काळ तिकिटाची उपलब्धता चेक करा

तात्काळ तिकिट काही वेळासाठीच उपलब्ध असतात. तात्काळ बुकिंगसाठी वेबसाइटची विंडो एका दिवसाआधीच सुरु होते. AC क्लाससाठी बुकिंग सकाळी 10 वाजता तर नॉन एसी क्लाससाठी सकाळी 11 वाजण्यापासून सुरू होतात. तुम्ही आयआरसीटीसीची वेबसाइट किंवा मोबाइल अॅपवर जावून ट्रेनची तात्काळ तिकिटाची उपलब्धता चेक करु शकता. 

पॅसेंजरची माहिती टाका

ट्रेन आणि कोच निवडल्यानंतर तुम्हाला प्रवाशांची माहिती द्यायची आहे. तुम्हाला प्रत्येक प्रवाशांचे नाव, वय, आयडी प्रुफ द्यावे लागेल. तात्काळ तिकिट बुक करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा पासपोर्ट यासारख्या कागदपत्रांची गरज भासणार आहे. 

पेमेंट करा

पॅसेंजर डिटेल दिल्यानंतर तुम्हाला पेमेंट करावे लागणार आहे. IRCTCच्या वेबसाइटवर क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, IRCRC e Wallet, UPI वॉलेट, नेट बँकिंग सारखे अनेक पर्याय आहेत. तुम्ही तुमच्या सुविधेनुसार पेमेंड मोड निवडू शकतात. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या तिकिटांची माहिती तुमच्या फोन नंबरवर मेसेज किंवा ईमेलच्या माध्यमाचून मिळणार आहे. यात तिकिट आणि पीएनआर नंबरसारखी माहिती असणार आहे. 

Tips For Booking Tatkal Tickets On IRCTC

- तात्काळ बुकिंग करताना थोडासा जरी उशीर झाला तरी संधी हुकू शकते. त्यामुळं आयआरसीटीसीच्या अकाउंटचे लॉगइन डिटेल्स जवळ ठेवा

- नेट बँकिंग, युपीआयसारख्या फास्ट पेमेंट पर्याय निवडा जेणेकरुन पेमेंट ट्रान्सेक्शन लगेचच होईल

- मास्टर लिस्ट बनवून सर्व प्रवाशांची माहिती आधीच काढून ठेवा. 

- कन्फर्म तिकिट बुक करण्याआधी हाय स्पीड इंटरनेट कनेक्शनची गरज आहे. हाय डिमांडमुळं तात्काळ तिकिट लवकर बुक होतात.

- तात्काळ तिकिट बुकिंग करताना अडथळा येत असेल तर तुम्ही बुकिंग एजेंटची मदत करु शकता. बुकिंग एजंट एक ठराविक रक्कम घेऊन तुम्हाला कन्फर्म तिकिट देण्यास मदत करु शकतात.