Gold Price Today: सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, जाणून घ्या आजचे सोने-चांदीचे दर

Gold and Silver Price कोरोनामुळे सोने- चांदीला झळाळी, आताच चेक करा लेटेस्ट दर

Updated: Dec 22, 2022, 12:28 PM IST
Gold Price Today: सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, जाणून घ्या आजचे सोने-चांदीचे दर title=
Gold Price Big news for gold buyers know todays gold silver rates marathi news nz

Gold Rate Today : लग्नसराईच्या दिवसांना जोरदार सुरुवात झालीय. अनेक लोक या दिवसांमध्ये सोनं खरेदी करण्यासाठी बाजारात जातात.  सोनं तसं अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे सोन्याचं दर (Latest Gold Rate) किती ही असला तरी अनेक जण सोनं खरेदी करतातच. पण हल्ली सोन्याच्या दरात साततत्यानं वाढ पाहायला मिळत आहे. मग सर्वसामान्यांसमोर सोनं घ्यावं की नाही असा प्रश्न उपस्थित होतो. 

सोन्याचे दर प्रतितोळा 56 हजार 650 रुपयांवर पोहोचले आहेत. सोन्याचे दर गगनाला भिडल्यामुळे सर्वसामान्यांची निराशा होत आहे. आतरंराष्ट्रीय पातळीवर अनेक होणाऱ्या मोठ्या बदलांमुळे सोनं महागल्याचं सांगितले जात आहे. 

सोन्याच्या दरात तुफान वाढ

गेल्या अनेक महिन्यांपासून सोन्याच्या दरात तुफान वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आजचे सोन्याचे दर हे दहा ग्रॅम शुद्ध सोन्यासाठी 49000 रुपये, तर जीएसटीसह हेच दर 56650 रुपयांवर पोहोचले आहे. सोन्याचा दर दिवसागणिक वाढत असल्यामुळे अनेकांना अंदाज बांधणे कठीण होत जात आहे. त्यावर व्यापाऱ्यांनी सोन्याच्या दरात वाढ होण्यामागे अनेक कारणे सांगितली आहेत. सध्या चीनमध्ये वाढता कोरोना, वधारलेला डॉलरचा दर, अमेरिकन फेडरल बँकांचे व्याजदर विषयक धोरण आणि ख्रिसमस. या कारणांमुळे सोन्याच्या दरात झपाट्याने वाढ पाहायला मिळत आहे.  

जगभरात ख्रिसमस या सणाची जोरदार तयारी सुरु आहे. या सणामुळे सोन्याच्या मागणीत वाढ झाली आहे. आणि त्यामुळेच सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळत आहे. येणाऱ्या काळात सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ पाहायला मिळणार आहे असा अंदाज व्यावसायिकांकडून वर्तविला जात आहे. सोन्याच्या वाढत चाललेल्या दरामुळे सर्वसामान्यासांठी मात्र सोनं घेणं हे स्वप्नापेक्षा कमी राहिलेलं नाही.  

सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरांतही मोठी वाढ 

गेल्या अनेक महिन्यांपासून सोन्याच्या दरात झपाट्याने वाढ पाहायला मिळत आहे. मात्र सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरांतही मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. हे दक दिवसेंदिवस वाढत चालले आहेत.  देशातील चांदीची मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खामगाव शहरात चांदीच्या दरांत मोठी वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चांदीचा कालचा भाव प्रतिकिलो 70,200 इतका झाला आहे. गेल्या महिन्यात हाच भाव जवळपास 63 ते 64 हजार रु प्रतिकिलो होता. अचानक दरवाढ झाल्यामुळे अनेकांना सोनं आणि चांदी घेणं मोठ्या आव्हानासारखं होऊन बसलं आहे. जगभरात सुरु असणाऱ्या अनेक कारणांमुळे सोनं आणि चांदीच्या दरात आता अचानक दरवाढ झाली आहे.