'मोदींनी अगोदरच पाकिस्तानविरोधात 'हा' डाव आखला होता'

मोदी सरकारने आजपर्यंत पाकिस्तानशी संबंध सुधारण्याचा केवळ दिखावा केला. 

Updated: Jul 5, 2018, 06:55 PM IST
'मोदींनी अगोदरच पाकिस्तानविरोधात 'हा' डाव आखला होता' title=

नवी दिल्ली: मोदी सरकारने आजपर्यंत पाकिस्तानशी संबंध सुधारण्याचा केवळ दिखावा केला. मुळात सुरूवातीपासूनच मोदी सरकारने पाकिस्तानला एकटं पाडायचा डाव आखला होता, असा आरोप माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांनी केला. 'डॉन' या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याविषयी भाष्य केले. यावेळी इम्रान खान यांनी म्हटले की, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी भारताशी संबंध सुधारण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, मोदी सरकारने पाकविरोधात सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यामुळेच आज भारत-पाक यांच्यातील तणाव इतक्या टोकाला पोहोचला आहे. 

नवाज शरीफ यांनी भारताशी संबंध सुधारण्यासाठी सर्वकाही केले. मोदींना घरी निमंत्रण देऊन वैयक्तिकरित्या शिष्टाई करण्याचाही प्रयत्न केला. तेव्हा कोणीही त्यामध्ये आडकाठी आणली नाही. मात्र, मोदी सरकारने कायमच पाकिस्तानला एकटे पाडण्याचे धोरण अवलंबले. त्यांची पाकविरोधातील भूमिका नेहमीच कमालीची आक्रमक राहिली. समोरचा असा वागत असेल तर एखाद्याने करावे तरी काय?, असा सवाल इम्रान खान यांनी उपस्थित केला.