Income Tax Return Deadline: आर्थिक वर्ष 2022-23साठी इनकम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) भरण्याची डेडलाइन जवळ येत आहे. इनकम टॅक्स भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 आहे. या तारखेपर्यंत रिटर्न दाखल करु शकणार आहेत. यानंतर मुदत वाढण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळं आयत्यावेळी आयटीआर भरणाऱ्या लोकांनी आत्ताच वेळ काढून ही प्रक्रिया पूर्ण करा. आता घरबसल्याही तुम्ही ही प्रक्रिया करु शकता. अगदी 15 मिनिटांत तुम्ही आयटीआर भरु शकणार आहाता. (Online Income Tax Return)
अनेकदा करदाते आपला आयटीआर भरण्यासाठी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीची मदत घेतात. सीए किंवा अन्य माहितीदार असलेल्या व्यक्तीकडे आयटीआर भरायला देतात. अशावेळी तो व्यक्ती मोठी रक्कम वसूल करतो. मात्र, आयटीआर भरणे खूपच सोप्प असतं. तुम्ही घरबसल्याही आयटीआर भरु शकणार आहात. आज आम्ही तुम्हाला पूर्ण प्रोसेस सांगणार आहोत. ज्यामुळं तुम्ही कुठल्या अडचणींशिवाय आयटीआर भरु शकता. जाणून घ्या सर्वकाही.
इनकम टॅक्स रिटर्न दाखल करण्यासाठी सर्वप्रथम ई-फाइलिंग पोर्टल www.incometaxindiaefiling.gov.in वर जा. जर तुमचं आधीच अकाउंट असेल त्याने लॉगइन करा. जर तुमचे अकाउंट नसेल तर रजिस्टर पर्यायाचा वापर करुन तुमचं अकाउंट सुरू करा. त्यानंतर होमपेजवर ई-फाइलचा पर्याय येईल. तिथे File Income Tax Returnचा ऑप्शन सिलेक्ट करा. आता तुमच्यासमोर असेसमेंट इअरचा पर्याय येईल.
मेनू 'ई-फाइल' वर क्लिक करा आणि नंतर 'इन्कम टॅक्स रिटर्न' या लिंकवर क्लिक करा. सर्व तपशील भरल्यानंतर, 'Continue' वर क्लिक करा. या स्टेपवरील सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा आणि ऑनलाइन ITR फॉर्मची अनिवार्य तपशील भरा. तसेच, सत्र कालबाह्य झाल्यास डेटा पुन्हा पुन्हा भरण्याचे कष्ट टाळण्यासाठी'सेव्ह ड्राफ्ट' बटणावर क्लिक करा. दरम्यान जर तुम्ही सॅलेरीड क्लासमध्ये येत असाल तर ITR-1 फॉर्म निवडा.
सॅलेरीड टॅक्सपेअरना आधीपासूनच पूर्ण भरलेला फॉर्म मिळेल. यात तुम्हाला सॅलरी स्लिप, फॉर्म 16 आणि एआयएस डेटा मिळू शकतो. रिटर्न क्लेम करण्याआधी बँकेची माहिती नीट तपासून घ्या. कमाल कर लाभ सुनिश्चित करण्यासाठी एकूण उत्पन्न, वजावट, भरलेले कर आणि कर दायित्व (असल्यास) पूर्णपणे तपासा. या प्रोसेसनंतर आयटीआर सबमिट करा. त्यानंतर तुमचा आयटीआर ई-व्हेरिफाय करावा लागेल. आयकर विभाग काहीच दिवसांत तुमच्या आयटीआरची प्रोसेस सुरु करेल. एक्नॉलेजमेंट नंबरच्या मदतीने तुम्ही आयटीआरचे स्टेटस चेक करु शकता.