माथेफिरुने जाळली रस्त्यावरील दुचाकी

जयपूरमधील करणी विहार पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या परिसरात एक विचित्र घटना घडली आहे. या ठिकाणी एका अज्ञात व्यक्तीने घराबाहेर उभ्या असलेल्या बाईकला चक्क आग लावल्याचा प्रकार समोर आला आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Dec 28, 2017, 09:13 PM IST
माथेफिरुने जाळली रस्त्यावरील दुचाकी title=
Image: Whatsapp

जयपूर : जयपूरमधील करणी विहार पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या परिसरात एक विचित्र घटना घडली आहे. या ठिकाणी एका अज्ञात व्यक्तीने घराबाहेर उभ्या असलेल्या बाईकला चक्क आग लावल्याचा प्रकार समोर आला आहे.

विकास नगर परिसरात ही घटना घडली असून सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्ट दिसत आहे की, एका माथेफिरु व्यक्ती बाईकच्या आजुबाजुला फिरत आहे. त्यानंतर तो पेट्रोल पाईप काढून आग लावतो. गाडीला आग लावत असताना माथेफिरुही होरपळला असता मात्र, तो थोडक्यात बचावला. 

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. 

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरु केला असून गुन्हाही दाखल केला आहे. 

सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत आहे की, रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घरासमोर गाडी पार्क केली. त्यानंतर अर्ध्या तासानंतर रात्री ९ एक व्यक्ती बाईकच्या शेजारी फिरताना दिसत आहे. तर त्यानंतर तो व्यक्ती घरासमोरील बाईकला आग लावतो.