मुंबई : केशरी-लाल आणि क्रिस्पी जिलेबी (Jalebi) त्यांच्या अनोख्या आकारासाठी आणि गोड चवीसाठी ओळखल्या जातात. जिलेबी ही गरम दूध, मलई किंवा रबडीसोबत खाता येते. (Jalebi With Hot Milk, Malai or Rabadi) पलक कपूर या फूड ब्लॉगरनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक विचित्र फूड फ्यूजन करण्याचा प्रयत्न करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. (Trending Video) तिनं बटाट्याच्या भाजीसोबत जिलेबी खाल्याचा व्हिडीओ शेअर केला आणि हे पाहून इंटरनेटवरील लाखो नेटकऱ्यांची चव खराब झाली, असे त्यांचे म्हणणे आहे. पलकच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. (Viral Video)
व्हिडिओमध्ये रस्त्याच्या कडेला एक दुकानदार जिलेबीवर गरम बटाट्याची भाजी टाकत आहे. पलकनं एक विचित्र फूड कॉम्बिनेशन करून पाहिलं आणि ते तिला त्याची टेस्ट थोडी आवडली. हे विचित्र कॉम्बिनेशन मथुरेच्या ओमा पहेलवानमध्ये आढळते. व्हिडिओसोबत पलकनं लिहिलं की, 'आतापर्यंतचा सर्वात विचित्र फूड कॉम्बो ट्राय केला! साहजिकच मथुरा-वृंदावनमध्ये बटाट्याच्या भाजीसोबतची जिलेबी खूप प्रसिद्ध आहे. म्हणून शेवटी हा कॉम्बो मी मथुरेतील ओमा पहेलवानवसोबत करून पाहिला. पलकच्या व्हिडिओला 2 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. जिलेबी आणि बटाटा-भाजी हे कॉम्बिनेशन पाहायला देखील कोणालाच आवडलं नाही.
लोकांचा असा विश्वास आहे की या कॉम्बिनेशननं लोकांची चव खराब केली आहे. इंटरनेटची इच्छा आहे की त्यांनी हा नवीन कॉम्बो पुन्हा कधीही पाहिला नाही. एका नेटकऱ्यानं लिहिलं की, 'अरे देवा, असं कोण खातं, हे काय कॉम्बिनेशन आहे?' दुसऱ्या नेटकरी म्हणाला की, 'याची काही गरज नाही, हे खाल्ल तर पोट नक्कीच खराब होईल.' तर असे बरेच नेटकरी आहेत ज्यांनी असे म्हटले आहे की ज्यांनी हे कॉम्बिनेशल केलं त्याला शोधा असे म्हटले आहे. तिसरा नेटकरी म्हणाला, 'अशा लोकांना पकडून चप्पलनं मारा.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'काही दिवसांपूर्वी चहाच्या आयस्क्रिमचं कॉम्बिनेशन पाहिलं.' दुसरा नेटकरी म्हणाला की, 'त्या दिवशी मी ओल्ड मॉंकची चहा पाहिली, लोक काहीही करतात.' (jalebi with aloo sabzi would you like to eat weird food combination netizens have different reaction)