श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून हिमवृष्टी सुरू आहे. राजौरीमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली असून पीरपंजाल पर्वत रांगांवर जणू काही बर्फाची चादर पसरल्याचं पाहायला मिळतंय. जम्मू काश्मीरच्या विविध भागात हिमवृष्टी सुरू असून जागोजागी रस्त्यावर बर्फ जमा झालाय. त्यामुळे विविध मार्गावरील वाहतूक विस्कळीत झालीय. इथला मुघल रोडही वाहतुकीसाठी बंद झालाय.
मुघलरोड परिसरात जोरदार हिमवृष्टी झाली. दरम्यान या हिमवृष्टीत १४० ट्रक चालक वाहकांची सुटका करण्यात भारतीय सैन्याला यश मिळालय. मागील तिन दिवसांपासून या बर्फाचा स्थानिक जनजीवनाला फटका बसलाय. यातच हे सर्व ट्रकचालक फसले होते. मात्र सैन्याने जीवाची बाजी लावत या सर्वांना सुखरुप शिबीरात आणले आहे.