नवी दिल्ली: धु़ळे जिल्ह्याचे सुपूत्र योगेश मुरलीधर भदाने यांना जम्मू-काश्मीर येथे विरमरण आहे. पाकिस्तानने केलेल्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देताना भदाने शहीद झाले. ते केवळ २८ वर्षांचे होते.
#JammuAndKashmir: Lance Naik Yogesh Muralidhar Bhadane, who was injured in ceasefire violation in Rajouri's Sunderbani sector today and later succumbed to his injuries. pic.twitter.com/zuUIYl1h2X
— ANI (@ANI) January 13, 2018
जम्मू काश्मीर राज्यातल्या सुंदरबनी सेक्टर इथे पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. यावेळी सीमेपलिकडून झालेल्या गोळीबारात योगेश भदाने शहीद झाले. २८ वर्षांचे योगेश भदाने धुळे जिल्ह्यातल्या खलाने गावातले रहिवासी होते. त्यांच्या पश्चात पत्नी पूनम आहेत.