Terrorists in Army Camp: गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर देशात सर्व संरक्षण यंत्रणा सतर्क झाल्या. रेल्वे स्थानकं, सार्वजनिक ठिकाणं इथपासून देशाच्या कानाकोपऱ्याच सुरक्षा यंत्रणांनी करडी नजर ठेवली. पण, इतका कडेकोट बंदोबस्त असतानाही दहशतवाद्यांच्या कुरापती थांबत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली. (Jammu and kashmir terrorist suicide attack encounter army man martyr)
स्वातंत्र्यदिनाला अवघे काही दिवस उरले असतानाच जम्मू काश्मीर आणि देशाच्या सीमेलगतच्या भागात मोठी कारवाई झाल्याची बातमी समोर आली आहे. jammu Kashmir च्या राजौरी भागात असणाऱ्या परगल या भागात लष्कराच्या तळावर दोन दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ला केला.
J&K | Two terrorists, who carried out a suicide attack on an Army company operating base 25 kms from Rajouri, killed; three soldiers lost their lives. Operations in progress.
(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/QspNSFhfX6
— ANI (@ANI) August 11, 2022
लष्कराकडून या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या झटापटीमध्ये भारतीय सैन्यदलातील 3 जवान शहीद झाले. प्राथनिक स्तरावर समोर आलेल्या माहितीनुसार राजौरीपासून 25 किलोमीटर असंतरावर असणाऱ्या लष्कराच्या तळावर हा हल्ला करण्यात आला. पण, वेळीच उरी हल्ल्याच्या पुनरावृत्तीचा हा कट उधळला गेला. या भागात सध्या लष्करानं शोधमोहिम हाती घेतली असून, नजीकच्या परिसरातही आवश्यक ती पावलं उचलत तत्सम मोहिमा राबवल्या आहेत.