नवी दिल्ली : सुंजवान लष्करी कॅंपवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू कश्मीरच्या विधानसभेत पाकिस्तान विरोधी घोषणा देण्यात आल्या.
त्याचवेळी नॅशनल कॉन्फरन्सचे आमदार अकबर लोन यांनी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या.
यानंतर झालेल्या टिकेनंतर आमदार लोन यांनी याची कबूली दिली आहे. पण नॅशनल कॉन्फरन्सने या विधानापासून हात झटकत पाकिस्तानचा निषेध केलाय.