मोठी दुर्घटना : बस चक्क कारवर चढली, बघता बघता 5 जण जिवंत जळाले

Accident News : बस आणि कारचा भीषण अपघात झाला. आज  झारखंडच्या  (Jharkhand) रामगढमध्ये (Ramgarh) झालेल्या अपघातात (Jharkhand Accident) 5 लोकांचा मृत्यू झाला. तर अन्य 2 लोक जखमी झाले. (Bus Hit Car)

Updated: Sep 15, 2021, 03:41 PM IST
मोठी दुर्घटना : बस चक्क कारवर चढली, बघता बघता 5 जण जिवंत जळाले title=
प्रतिकात्मक छाया । photo credit: PTI

रामगढ : Accident News : बस आणि कारचा भीषण अपघात झाला. आज  झारखंडच्या  (Jharkhand) रामगढमध्ये (Ramgarh)झालेल्या अपघातात (Jharkhand Accident) 5 लोकांचा मृत्यू झाला. तर अन्य 2 लोक जखमी झाले आहेत. रामगढचे एसपी प्रभात कुमार यांनी सांगितले की, रामगढ जिल्ह्यातील राजराप्पा पोलीस स्टेशन परिसरातील गोला-रामगढ रस्त्यावरील मुरबंदा लारीजवळ सकाळी आठच्या सुमारास कार दुसऱ्या बाजूने येणाऱ्या बसला धडकली. बस कारवर चढली. त्यानंतर कारमधील पाचही लोक तेथे अडकले. या वेळी कारला आग लागली आणि कारमधील पाचजण होरळून ठार झालेत. (Bus Hit Car)

जळालेल्या मृतदेहाची ओळख पटवणे अशक्य  

भीषण अपघातानंत थोड्याच वेळात कारला आग लागली आणि एक मुलगा आणि दोन महिलांसह सर्व पाच जण जागीच जळून गेले (Five People Burnt Alive In Car). अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह इतके जळाले आहेत की त्यांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. सर्व मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

रामगढच्या एसपीनी सांगितले की, वाहन पाटणाच्या आलोक रोशनच्या नावाने नोंदणीकृत आहे. मृतांची ओळख आणि इतर कारवाईसाठी पाटणा पोलिसांशी संपर्क साधण्यात आला आहे.

दुभाजकाला धडकल्यानंतर कार उलटली

एसपी प्रभात कुमार म्हणाले की, आणखी एक अपघात कुज्जू व्हॅलीमध्ये झाला. बिहारमधील शेखपुरा येथील पाच लोक राजराप्पा येथील छिन्नमस्तक मंदिराच्या दर्शनासाठी कारने येत होते. सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास जास्त वेग असल्याने, गाडीवरील नियंत्रण सुटले कुज्जू खोऱ्यातील रस्ता दुभाजकाला धडकल्यानंतर कार उलटली. यामुळे कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.

मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी 

 गंभीर जखमींना रांचीच्या रिम्स रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे, तर इतर दोन जणांवर रामगढमध्येच उपचार सुरू आहेत. अपघातात ठार झालेल्या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.