मंदिर स्थापनेमुळे अत्याचारांच्या वेदनांचं निवारण होईल - कालीचरण महाराज

आज समस्त हिंदूंसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे.  

Updated: Aug 5, 2020, 01:31 PM IST
मंदिर स्थापनेमुळे अत्याचारांच्या वेदनांचं निवारण होईल - कालीचरण महाराज  title=

अयोध्या : आज समस्त हिंदूंसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. सध्या अयोध्येत सर्वत्र रामनामाचा जयघोष होत आहे. दुपारी १२.४० वाजता राम मंदिराच्या पायाभरणीची स्थापना होणार आहे.  या  ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी याठिकाणी अनेक संत-महंत देखील दाखल झाले आहेत. तर या सोन्याच्या दिवशी कालीचरण महाराज देखील अयोध्यानगरीत दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी 'झी २४ तास' सोबत संवाद साधला आहे. शिवाय अनेक गोष्टींचं महत्त्व पटवून देत आपल्या संगीताने भक्तांचे कान तृप्त केले आहेत. 

ते म्हणाले, 'मंदिर स्थापन झाल्यानंतर याठिकाणी अद्भुत क्रांती होणार कारण नारायण आहेत तिथे महालक्ष्मी राहणार.  ५ लाख मंदिरं तोडून मशिदी तयार करण्यात आल्या. ५०० वर्षांच्या अत्याचाराच्या, अक्रमनाच्या ज्या वेदना होत्या त्यांचं निवारण मंदिर स्थापनेमुळे होणार.'  याठिकाणी येत्या काळात औद्योगिक क्रांती होणार असं मत देखील त्यांनी मांडलं. 

'जे धर्मनिरपेक्षतेची गोष्ट करतात त्यांना धर्म काय आहे हे माहितचं नाही कारण जिथे धर्म नाही तिथे अधर्मच असणार आहे, जिथे प्रकाश नाही तिथे अंधःकारच असणार आहे, जिथे पुण्य नाही तिथे पापच असणार आहे.  ज्यांना धर्माच्या नावाखाली अत्याचार केले, आक्रमणं केली  ते धर्मच नसल्याचं ते म्हणाले. 

हिंदू धर्माचं महत्त्व पटवून देत ते म्हणाले, 'हिंदी, तामिळ, तेलगू, मराठी, मारवाडी, गुजराती, बंगाली, युपी, बिहारी हे सर्व निरर्थक वाद आहेत ते हाणून पाडले पाहीजे आणि फक्त हिंदू म्हणून पुढे आलं पाहिजे. हिंदूत्व हेच सर्वाचं ब्रिद वाक्य असलं पाहिजे. जेव्हा आपण हिंदू म्हणून विचार करू तेव्हा राष्ट्राची प्रगती होईल. असं देखील ते म्हणाले.