Kalpana Chawala : अंतराळवीर कल्पना चावला यांच्या आयुष्यातील 'ते' अंतिम क्षण कसे होते?

Kalpana Chawala Birthday: कल्पना चावला यांचे नाव ऐकले की आपल्या सर्वांनाच त्यांची प्रेरणा (Kalpana Chawala VIDEO) वाटते त्यांच्या कार्याचे सगळ्यांनाच कौतुक वाटत राहते, त्यांनी आपल्या आयुष्यातील अडचणींवर मात करत आपले अंतराळवीर होण्याचे स्वप्न पुर्ण केले होते. परंतु एका दुर्देवी घटनेनं त्यांचा (Last Moments of Kalpana Chawala) जीव घेतला आणि त्यांची कहाणी ही अधुरीच राहिली. 

Updated: Mar 18, 2023, 04:03 PM IST
Kalpana Chawala : अंतराळवीर कल्पना चावला यांच्या आयुष्यातील 'ते' अंतिम क्षण कसे होते? title=
Kalpana Chawala birth anniversary what was the last moments of astronut kalpana chawala with she and her companions were on their last space mission

Kalpana Chawala: अंतराळवीर कल्पना चावला (Kalpana Chawla) या 20 वर्षांंपुर्वी केलेले कार्य आजही आपल्या सगळ्यांच्याच स्मरणात आहे. जगातील पहिली भारतीय महिला अंतराळवीर म्हणून कल्पना चावला यांना मान मिळाला होता. असं असलं तरी कल्पना चावला (Kalpana Chawla Death) या संपुर्ण जगाला आपलं कुटुंब, घर मनायच्या. आपण अशाच एका आकाशगंगेतून आलेलो आहोत अशीच त्यांची भावना होती. कल्पना चावला यांनी लहानपणापासूनच अंतराळवीर होण्याचे स्वप्न पाहिले होते. आणि आयुष्यात तारूण्यात त्यांनी आपले हे स्वप्न पुर्णही करून दाखवले होते. STS - 107 (Spaceshuttle NASA) या स्पेसशटलमधून कल्पना चावला आणि तिच्यासोबत असणारे तिचे सहकारी हे 1 फेब्रुवारी 2003 ला पृथ्वीवर परत येताना अपघात होऊन मृत्यूमुखी पडले. या घटनेनं सगळ्यांनाच धक्का बसला होता. 

लहानपणापासूनच स्वप्न  - 

कल्पना चावला यांचा जन्म 17 मार्च 1962 रोजी हरियाणातील कर्नाल (Kalpana Chawla Birthday) येथे झाला होता. त्यांनी येथूनच आपल्या अंतराळवीर होण्याच्या प्रवासाला सुरूवात केली होती. त्यांच्या महत्त्वाकांक्षा या खूप मोठ्या होत्या. त्यांनी फार कमी कालावधी अनेक गुण संपादन केले होते. त्यांनी एका मुलाखतीत असं म्हटलं होतं की, मी कधी अंतराळवीर होईन असं मला वाटलं नव्हतं. मी अगदी फारच छोट्या शहरातून आले आहे परंतु मी स्वत:ला फार भाग्यवान समजते. 

असा घडला प्रवास - 

चंदीगढमधून त्यांना वैमानिक अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले होते. त्यानंतर त्या 1982 साली अमेरिकेत (Aeronautical Engineering) गेल्या होत्या. 1984 साली त्यांनी टेक्सास विद्यापीठातून एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये मास्टर ऑफ सायन्स पदवी प्राप्त केली आणि 1988 मध्ये कोलोरॅडो विद्यापीठातून एरोस्पेस अभियांत्रिकीमध्ये पीएड मिळवली. त्यांनी कराटेचेही शिक्षण घेतले होते. 

मृत्यूच्या दिवशी काय घडलं? 

अमेरिकेच्या नासाचे स्पेस शटल कोलंबिया आपली अंतराळ मोहीम (Space Mission) संपवून पृथ्वीच्या वातावरणात आले तेथून ते परत जमीनवर येत असतानाच शटल पत्रा त्याच्या एका भागाला आदळला आणि अपघात होऊन स्पेस शटल क्रॅश झाले. कल्पना चावलासह स्पेस शटलमध्ये असणाऱ्या सहकाऱ्यांचा या दुर्देवी घटनेत मृत्यू झाला होता. 1998 साली त्यांनी आपले पहिले स्पेस मिशन पुर्ण केले होते. त्यांनी या दरम्यान आपलं ट्रेनिंगही पुर्ण केले होते. त्यांचे स्पेस शटल पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करणार तोच त्यांचे स्पेस शटलचा अपघात झाला आणि तापमान वाढल्याने ते अवकाशातच नष्ट झाले आणि त्याचे काही अवशेष पृथ्वीवर पडले.