कारगिल विजय दिवस : जेव्हा भारतीयांनी पाकड्यांना पळवून लावलं

तेव्हापासून प्रत्येकवर्षी हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. 

Updated: Jul 26, 2018, 11:01 AM IST
कारगिल विजय दिवस : जेव्हा भारतीयांनी पाकड्यांना पळवून लावलं  title=

नवी दिल्ली : २६जुलै १९९९ ला भारताने कारगिल युद्धात पाकिस्तानविरुद्ध युद्ध जिंकलं. तेव्हापासून प्रत्येकवर्षी हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.  मे १९९९ मध्ये सुरू झालेलं हे युद्ध १९९९ पर्यंत चालंल ज्यामध्ये आपले ५२७ जवान शहीद झाले तर १३०० जवान जखमी झाले. पाकिस्तानकडुन या युद्धाला सुरूवात करत ५ हजार सैनिकांना घेऊन कारगिलच्या पर्वतात घुसखोरी केली गेली. त्यानंतर 'ऑपरेशन विजय'ला सुरूवात झाली. या युद्धात भारतीय एअरफोर्सने आपली ताकद दाखवत पाकिस्तानने ज्या जागेवर कब्जा केला तिथे बॉम्बहल्ले केले. 

वायुसेनेची ताकद 

कारगिल युद्धात एकूण २ लाख गोळे डागण्यात आले. ३०० हून अधिक मोर्टार, तोफ, रॉकेटचा वापर करण्यात आला. पाकिस्तानला मागे हटविण्यासाठी भारतीय वायुसेनाने मिग २७ आणि मिग २९ चा वापर केला. पाकिस्तानच्या हद्दीत असलेल्या भागांवरही बॉम्बहल्ला केला. पाकिस्तानच्या अनेक भागात आर-७७ मिसाइलने हल्ला केला गेला. 

कशी मिळाली घुसखोरांची माहिती ?

३ मे १९९९ ला एक गुराख्याने भारतीय सेनेला कारगिलमध्ये पाकिस्तानी घुसखोर घुसल्याची माहिती दिली. त्यानंतर पेट्रोलिंग टीम याची माहिती घेण्यास गेली तेव्हा घुसखोरांनी त्यांना पकडले आणि ५ सैनिकांची हत्या केली. इथूनच कारगिल युद्धाला सुरूवात झाली. जुनच्या सुरूवातीलाच भारतीय सेनेने अनेक चौक्या परत घेण्यास सुरूवात केली. १४ जुलैला तात्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ऑपरेशन विजय जिंकल्याची घोषणा केली आणि २६ जुलैला विजय दिवस साजरा करण्याची घोषणा केली.