बंगळुरु : ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची त्यांच्या राहत्या घरी गोळ्या घालून निघृण हत्या केली. या हत्या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटल्याचं पहायला मिळालं.
गौरी लंकेश यांची हत्या झाल्यानंतर देशभरातील विचारवंतांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत सरकारने चौकशीसाठी आम्ही एसआयटीचे अधिकारी नेमले आहेत.
तसेच, गौरी लंकेश यांच्या हल्लेखोरांची माहिती देणाऱ्याला कर्नाटक सरकारनं १० लाखांचं बक्षीसही घोषित केलं आहे. कर्नाटकचे गृहमंत्री रामलिंगा रेड्डी यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. या प्रकरणाच्या तपासासाठी २१ सदस्यांची एसआयटी नेमण्यात आली आहे.
ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची ५ सप्टेंबर रोजी त्यांच्या राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्या 'लंकेश पत्रिका' या कन्नड साप्ताहिकाच्या त्या संपादिका होत्या. गौरी लंकेश या देशातील असहिष्णुता आणि हिंदुत्वाच्या नावाखाली सुरू असलेल्या उन्मादाच्या प्रखर विरोधक होत्या.
गौरी लंकेश यांच्या हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेजचीही मदत घेतली आहे. दरम्यान, पोलिसांच्या हाती अद्याप कुठलाही धागादोरा लागलेला नाहीये.