काश्मीर भारताचाच, पाकिस्तानने लुडबुड थांबवावी- ओवेसी

पाकिस्तानात केवळ मुस्लीम व्यक्तीच राष्ट्रपती होऊ शकतो.

Updated: Jan 20, 2019, 11:48 AM IST
काश्मीर भारताचाच, पाकिस्तानने लुडबुड थांबवावी- ओवेसी title=

हैदराबाद: पाकिस्तानने काश्मीरमध्ये लुडबुड करणे थांबवावे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे आणि राहील, अशा शब्दांत एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांनी पाकिस्तानला फटकारले. ते हैदराबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते. पाकिस्तानी संविधानानुसार तिथे केवळ मुस्लीम व्यक्तीच राष्ट्रपती होऊ शकतो. मात्र, भारतात अल्पसंख्यांक समाजाचे अनेक राष्ट्रपती होऊन गेल्याची आठवणही त्यांनी पाकिस्तानला यावेळी करुन दिली.

मध्यंतरी हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते नसीरुद्दीन शहा यांच्या वक्तव्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. नसीरुद्दीन शाह यांनी या देशात गायीच्या मृत्यूचे महत्त्व पोलिसाच्या मृत्यूपेक्षा जास्त आहे असे वक्तव्य केले होते. यानंतर त्यांच्यावर टीकेची मोठी झोड उठली होती. त्यांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत इम्रान खान यांनी म्हटले होते की, नसीरुद्दीन शहा यांनी आता जे म्हटलंय ते पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जीना यांनी फार पूर्वीच म्हटले होते. भारतात मुस्लिमांना बरोबरीची वागणूक मिळत नाही हे जिना यांना माहिती होते. त्यामुळे त्यांनी वेगळ्या पाकिस्तानची मागणी केली, असे सांगत इम्रान खान यांनी भारताला डिवचले होते. 

मात्र, नसीरुद्दीन शहा यांनी लगेचच इम्रान खान यांना प्रत्युत्तर दिले होते. तुम्ही स्वत:च घर सांभाळा, इतरांच्या भानगडीत पडू नका. इम्रान खान यांचा या मुद्द्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळे त्यांनी इतरांच्या भानगडीत पडण्याऐवजी स्वत:चा देश सांभाळण्याकडे लक्ष द्यावे. आमच्या देशात गेल्या ७० वर्षांपासून लोकशाही आहे. त्यामुळे स्वत:चे प्रश्न कसे हाताळायचे, हे आम्हाला ठाऊक आहे, असा पलटवार शहा यांनी केला होता. 

पाकिस्तानने काश्मीरमध्ये लुडबुड करणे थांबवावे. काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे आणि राहील, अशा शब्दांत एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांनी पाकिस्तानला फटकारले. ते हैदराबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते. पाकिस्तानी संविधानानुसार तिथे केवळ मुस्लीम व्यक्तीच राष्ट्रपती होऊ शकतो. मात्र, भारतात अल्पसंख्यांक समाजाचे अनेक राष्ट्रपती होऊन गेल्याची आठवणही त्यांनी पाकिस्तानला यावेळी करुन दिली.