देशातील सर्व खेड्यात वीज पोहचवण्याचं नरेंंद्र मोदींचं स्वप्न झालं पूर्ण

 अन्न,वस्त्र, निवार्‍या इतकीच आज भारतातील खेड्या खेड्यात वीजेची गरज आहे. 

Updated: Apr 30, 2018, 10:24 AM IST
देशातील सर्व खेड्यात वीज पोहचवण्याचं नरेंंद्र मोदींचं स्वप्न झालं पूर्ण  title=

नवी दिल्ली : अन्न,वस्त्र, निवार्‍या इतकीच आज भारतातील खेड्या खेड्यात वीजेची गरज आहे. देशातील प्रत्येक खेड्या-पाड्यात वीज पोहचवणं हे भारत सरकारचं उद्दिष्ट होतं.  1000 दिवसांच्या आत देशातल्या सर्व खेड्यांमध्ये वीज पोहचण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घालून दिलेलं उदिष्ट पूर्ण झाल्याची माहिती स्वतः पंतप्रधानांनी ट्विटर हँडलवरून दिली आहे.

नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून दिली माहिती 

 

नरेंद्र मोदींनी लाल किल्यावरील भाषणातून देशातील सुमारे 18 हजार गावांमध्ये वीज आणण्याचा संकल्प सोडला होता. तो पूर्ण झाल्याची माहिती मोदींनी दिली आहे. मणिपूरमधील लायसिंग हे वीज येणारं देशातलं सर्वात शेवटचं गाव ठरलं. 28 एप्रिल 2018 हा दिवस देशाच्या इतिहासात नोंद करूऩ ठेवण्यासारखा दिवस असल्याचं मोदींनी ट्विटरवर म्हटलंय.