चढण्यासाठी स्वतःची पाठ दिलेल्या 'त्या' व्यक्तीला कार गिफ्ट

पाहा हा व्हिडिओ

चढण्यासाठी स्वतःची पाठ दिलेल्या 'त्या' व्यक्तीला कार गिफ्ट  title=

मुंबई : केरळातील प्रलयाचा तो व्हिडिओ आठवतोय..  ज्या व्हिडिओत एका मच्छिमाराने महिलांनी बोटीत चढण्यासाठी आपली पाठ पाय ठेवण्यासाठी दिली होती. त्या मच्छिमाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. त्याचं संपूर्ण जगातून खूप कौतुक करण्यात आलं. याच मच्छिमाराचं आनंद महिंद्रा यांनी भरभरून कौतुक केलं आहे. आपल्याला माहितच आहे आनंद महिन्द्रा आपल्या दिलदारपणामुळे अनेकदा ओळखले जातात. आतापर्यंत आनंद महिंद्रा यांनी अनेकांना मदत केली आहे या यादीत आता मच्छिमार जैसल के.पी. यांच नाव जोडलं गेलं आहे. 

मुसळधार पाऊस आणि पुरामुळे केरळ उद्धवस्त झालं. केरळातील सामान्यांचे प्राण वाचवण्यासाठी मच्छिमार जैसल याची खूप मदत झाली. 32 वर्षांचा जैसल पुरात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी अथक प्रयत्न केले. यासाठी अडकलेल्या लोकांना बोटीतून बाहेर काढण्यात आलं. महिलांना या बोटीत नीट चढता यावं यासाठी जैसलने आपल्या पाठीचा पायरी म्हणून वापर केला. आणि महिलांना बोटीत योग्यप्रकारे चढू दिलं. जैसलचा हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला.

या घटनेनंतर केरळचे कामगार मंत्री टी पी रामकृष्णन यांनी जैसलला सन्मानित करण्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर आता आनंद महिंद्रा यांनीही जैसलची दखल घेतली आहे. मात्र, केवळ घोषणा करण्याचं काम न करता महिंद्रा यांनी नुकतीच लाँच झालेली महिंद्र माराझो देऊन त्याचा गौरव केला आहे. केरळमधील कालिकत इथे केरळच्या कामगार मंत्र्यांच्या हस्ते या कारची चावी जैसलला सोपवण्यात आली.