नवी दिल्ली : Kia India ने भारतात जबरजस्त परफॉर्म केले आहे. Kia ने भारतात आपल्या कामकाजाच्या दोन वर्षात आपली कॉम्पॅक्ट SUV सेल्टोस (Seltos)च्या 2 लाखाहून अधिक कारांची विक्री केली आहे. याशिवाय कंपनीने भारतात आपले काम सुरू केल्यानंतर दीड लाखाहून अधिक कनेक्टेड कार विकल्या आहेत.
टोटल्स सेल्समध्ये सेल्टोसची हिस्सेदारी 66 टक्केहून जास्त आहे. या महिन्याच्या सुरूवातीला किया इंडिया भारतात 3 लाख युनिट सेल्स मिळवणारी फास्टेस्ट कार मॅन्युफॅक्चरर बनली आहे. किया कंपनीच्या मते, त्यांच्या टोटल सेल्समध्ये सेल्टोसची हिस्सेदारी 66 टक्के आहे.
किया सेल्टोसच्या टोटल सेल्समध्ये डिझेल वेरिएंट्सची हिस्सेदारी 45 टक्क्यांपर्यंत राहिली आहे. सेल्टोसच्या नवीन iMT वेरिएंटला 4 महिन्याहून कमी वेळात जबरजस्त प्रतिसाद मिळाला आहे.
Kia India चे कार्यकारी व्यवस्थापक ताए जिन पार्कने म्हटले आहे की, आम्ही लोकप्रिय सेगमेंटमध्ये गेम चेंजिंग उत्पादनांना लॉंच करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये ग्राहकांना कियाचा मालक होण्याचा वेगळा आणि खास अनुभव मिळेल. फक्त दोन वर्षात ब्रॅंड कियाबद्दल भारतीयांनी खूप प्रेम आणि विश्वास दाखवला आहे. ही आमच्यासाठी सुखद गोष्ट आहे.