नवी दिल्ली : अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सलग चौथ्या दिवशीही पेट्रोलच्या किंमतींनी दिलासा दिला आहे. तेल कंपन्यांनी चौथ्या दिवशीही पेट्रोलच्या किंमतीत कोणताच बदल केला नाही. तर डिझेलच्या किंमतीत प्रति लीटर 10 पैशांनी घसरण झाली. याआधी गुरुवारी डिझेलच्या किंमतीत 15 पैसे प्रति लीटर घट पाहायला मिळाली होती. दिल्लीमध्ये शुक्रवारी पेट्रोल 72.90 रुपये किंमतीवर स्थिर राहीले. तर डिझेल 10 पैशांनी कमी होऊन 66.24 प्रति लीटर स्तरावर पोहोचले.
मुंबईत एक लीटर पेट्रोलची किंमत 78.52 रुपये तर डिझेल 69.43 रुपये आहे. कोलकातामध्ये 1 लीटर पेट्रोल 75.12 रुपये प्रति लीटर तर डिझेल 68.31 रुपये प्रति लीटर आहे. तर चेन्नईमध्ये एक लीटर पेट्रोलची किंमत 75.71 रुपये आणि डिझेलची किंमत 69.97 रुपये प्रति लीटर आहे.
सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर एक्साइज ड्युटी वाढवली तसेच सेस देखील जोडला. त्यानंतर पेट्रोल 2.45 रुपये आणि डिझेल 2.36 रुपये प्रति लीटरने महागले. दुसरीकडे क्रूड ऑईलच्या किंमतीही थोड्या प्रमाणात वाढल्या. शुक्रवारी क्रूड ऑईलच्या किंमतीत हलकी वाढ झाल्याने ते 60.51 प्रति बॅरलच्या स्तरावर पोहोचले. तर ब्रेंट क्रूड ऑईल 66.83 प्रति बॅरल स्तरावर राहीले.