Aadhaar card बँक अकाऊंटशी लिंक आहे का? असं तपासा...

आधारकार्ड बँक अकाऊंटशी लिंक असणं अनिर्वाय आहे.

Updated: Jan 19, 2020, 03:54 PM IST
Aadhaar card बँक अकाऊंटशी लिंक आहे का? असं तपासा...
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : आधार कार्ड सर्वच ठिकाणी अतिशय महत्त्वाचं झालं आहे. सरकारी किंवा इतर जवळपास सर्वच कामांसाठी आधारकार्ड असणं आवश्यक आहे. बँकमध्ये आपल्या अकाऊंटशी आधार लिंक करणं अनिर्वाय आहे. बँक अकाऊंटशी आधार कार्ड लिंक नसल्यास अकाऊंट फ्रीज केलं जाऊ शकतं. त्यामुळे तुमचं आधारकार्ड बँक अकाऊंटशी लिंक असणं महत्त्वाचं आहे. आधार लिंक आहे की नाही हे तपासणं किंवा लिंक केलं असल्यास तेही घरबसल्या एका क्लिकवर चेक करता येऊ शकतं. 

याठिकाणी आधार लिंक करणं आवश्यक -

- पॅन कार्ड
- बँक अकाऊंट
- LPG गॅस कनेक्शन
- रेशन कार्ड
- मतदार ओळखपत्र

UIDAIची अधिकृत वेबसाईट  uidai.gov.in ओपन करा. त्यानंतर Aadhaar Services या ऑप्शनवर क्लिक करा. याच ऑप्शनमध्ये Check Aadhaar Bank Linking Status दिसेल. त्यावर क्लिक करुन एक नवीन पेज ओपन होईल. तिथे तुमच्या आधार कार्डचा १२ अंकी नंबर टाईप करा. त्यानंतर खाली दिलेला सिक्युरिटी कोड टाईप करा. सिक्युरिटी कोड टाईप केल्यावर, तुमच्या फोनवर एक ओटीपी येईल.

ओटीपी मिळाल्यानंतर पुन्हा एकदा लॉगइन करुन, आधार कार्ड बँक अकाऊंटशी लिंक आहे की नाही याबाबत माहिती मिळेल. जर आधार आधीच लिंक असेल तर, Congratulations! Your Bank Aadhaar Mapping has been done असा संदेश मिळेल.

याशिवाय, स्क्रिनवर आधार खातं असणाऱ्याचं नाव, आधार लिंक झाल्याचं स्टेटस आणि लिंक झाल्याच्या तारखेची माहितीही मिळेल. सरकारने आधार कार्ड, महत्त्वाच्या कागदपत्रांशी लिंक करणं अनिवार्य केलं आहे.