How to Withdraw Money from Inactive Account : अनेकदा आपण आपल्या विविध कामानिमित्त वेगवेगळ्या बँकेमध्ये खाते उघडतो पण त्यानंतर त्या खात्यांमधून कसलाही व्यवहार झाला नाही तर रिझर्व बँकच्या (RBI) नियमानुसार त्या खात्यांमध्ये जमा असलेली रक्कम रिझर्व बँकेच्या डिपॉजिटर एजुकेशन अँड अवेअरनेस फंडमध्ये (DEAF) टाकली जाते. RBI कडे ही रक्कम प्रत्येक वर्षी वाढतच जातेय आणि आत्ता ही रक्कम 40 हजार कोटी रुपयांच्या जवळपास पोहोचली आहे. जर तुमचेही वेगवेगळ्या बँकांमध्ये खाते असतील आणि ते तुम्ही वापरात नसल्यामुळे बंद असतील (Inactive Bank Account) तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
RBI च्या नियमांनुसार, सर्वात आधी तुम्हाला याची माहिती असायला हवी की, ज्या बंद असलेल्या खात्यामधून (Inactive Bank Account) तुम्हाला रक्कम काढू इच्छिता, त्या खात्यात नक्की रक्कम आहे की नाही. यासाठी तुम्हाला बँकेशी संपर्क करुन माहिती घेणे आवश्यक आहे. त्यावेळी बँकेमध्ये खातेदाराचं आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्मतारीख, नाव, पत्ता यांबद्दलची माहिती द्यावी लागेल.
यामाहितीची खात्री पटल्यानंतर खातेदाराला किंवा खातेदाराच्या नॉमिनीला त्या खात्यात असलेली रक्कम सांगितली जाते. बऱ्याच बँकाकडून ही माहिती त्याच्या अधिकृत वेबसाईटद्वारे देखील उपलब्ध केली जाते. अशावेळी तुम्ही वेबसाईटवर देखील नजर टाकायला हवी.
फायनांस एक्सपर्ट नुसार, जर तुम्ही स्वत: खातेधारक असाल तर बँक अधिकारी काही महत्वाचे कागदपत्र घेऊन आणि सर्वसाधारण चौकशी करुन बंद खात्यात (Inactive Bank Account) असणारी रक्कम व्याजासहीत परत देतात. जर तुम्ही त्या खातेदारांचे नॉमिनी असाल तर खात्यातली रक्कम मिळवण्यासाठीची पद्धत ही वेगळी आहे. जर खातेदाराचा मृत्यू झालेला असेल तर खातेदाराचं मृत्यू प्रमाणपत्र आणि काही महत्वाचे कागदपत्र बँकेमध्ये जमा करावे लागतील. त्यानंतरच नॉमिनीला त्या खात्यातली रक्कम व्याजासहीत मिळेल.
जर खातेदाराचा मृत्यू झालेला असेल आणि त्याच्या कुटूंबातली कोणत्याही व्यक्तीला नॉमिनी ठेवलेलं नसेल, तर तुम्हाला खातेदाराचे पासबुक आणि इतर महत्वाचे कागदपत्र घेऊन बँकेशी संपर्क करावा लागेल. तसेच, तुम्हाला वारस प्रमाणपत्र बँकेत जमा करावं लागेल. परंतु ही रक्कम मोठी असेल तर, सक्सेशन सर्टिफिकेट बँकेत जमा करावे लागेल. त्यानंतर जेव्हा बँकेचे मॅनेजमेंट फिर्यादीच्या अर्जावर समाधानी झाल्यानंतर दावा न केलेली रक्कम 15 दिवसांच्या आत परत मिळते.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही FD किंवा RD खातेदार असाल आणि 8 वर्षे त्या खात्यातून कोणताही व्यवहार झालेला नसेल तर ते खातं बंद (Inactive Bank Account) केलं जातं. तसेच, बचत खातं आणि करंट अकाउंटसाठी ही मुदत 2 वर्षांची असते. त्यानंतर खात्याला बंद करुन त्या खात्यातल्या रकमेला DEAF मध्ये पाठवलं जातं. म्हणून, तुमच्या खात्याला बंद होण्यापासून वाचण्यासाठी त्या खात्यातून व्यवहार चालू ठेवावा.
जर तुम्ही एकापेक्षा अधिक खात्यांचा वापर करणार नसाल तर बँकेला अॅप्लीकेशन करुन ते खातं बंद करु शकता. यामुळे, त्या खात्यात असणारी रक्कम तुम्हाला वापस मिळू शकते. त्याबरोबरच, तुमच्या खात्याला नॉमिनी देखील बनवून ठेवा.