क्रेडिट आणि डेबिट कार्डमध्ये फरक काय? याचा व्याज, खर्च मर्यादा संबंधित जाणून घ्या संपूर्ण नियम

 लोकांना या दोन्ही गोष्टी समान वाटतात, परंतु तसे नाही. आज आम्ही तुम्हाला यासंदर्भात माहिती सांगणार आहोत.

Updated: Oct 16, 2021, 03:50 PM IST
क्रेडिट आणि डेबिट कार्डमध्ये फरक काय? याचा व्याज, खर्च मर्यादा संबंधित जाणून घ्या संपूर्ण नियम title=

मुंबई : जेव्हा कोणतीही व्यक्ती बँक खाते उघडते तेव्हा त्यासोबत चेकबुक, पासबुक आणि एटीएम कम डेबिट कार्ड देखील मिळते. त्यानंतर जेव्हाही तुमच्या खात्याला थोडा वेळ होतो, तेव्हा बँक तुम्हाला क्रेडिट कार्ड देखील देते. परंतु बऱ्याच लोकांना डेबिट आणि क्रेडिट कार्डमध्ये काय फरक आहे याबद्दल माहित नसते. लोकांना या दोन्ही गोष्टी समान वाटतात, परंतु तसे नाही. आज आम्ही तुम्हाला यासंदर्भात माहिती सांगणार आहोत.

डेबिट कार्ड म्हणजे काय?

डेबिट कार्ड हे तुमच्या बचत किंवा चालू बँक खात्याशी जोडलेले कार्ड आहे. जेव्हा तुम्ही बँक खाते उघडता, तेव्हा बँक एक कार्ड जारी करते, ज्याचा वापर तुम्ही ATM आणि POS टर्मिनलवर पैसे काढण्यासाठी किंवा तुमच्या खर्चासाठी करू शकता.

तुमच्या डेबिट कार्डमधून रक्कम आपोआप आणि त्वरित जमा केली जाते किंवा वजा केली जाते. तसेच यासाठी तुमच्या बँकेत पैस असावे लागतात. बँका मोफत डेबिट कार्ड ऑफर करतात आणि एक लहान वार्षिक देखभाल शुल्क आकारतात.

क्रेडिट कार्ड म्हणजे काय?

क्रेडिट कार्ड हा आणखी एक प्रकारचा कार्ड आहे. ज्याद्वारे तुम्ही बँक किंवा वित्तीय संस्थेकडून पैसे घेऊ शकता. बँक त्यात क्रेडिट मर्यादा देखील घालते. ही मर्यादा तुमच्या उत्पन्नावर आधारित आहे आणि वेळोवेळी वाढवली जाते. बँक तुमच्या क्रेडिट कार्डच्या खर्चाचे बिल करते आणि तुम्हाला ते देय तारखेपर्यंत भरावे लागते.

या कार्डचा वापर करण्यासाठी तुमच्या बँकेत पैसे असणे गरजेचे नाही. तुम्ही आधी बँकेकडून उसने पैसे घेऊन त्याचा वापर करु शकता. परंतु नंतर तुम्हाला देय तारखेपर्यंत त्या अकाउंटमध्ये पैसे भरावे लागतेत. जर आपण क्रेडिट कार्ड कर्जाची परतफेड करण्यास सक्षम नसल्यास, बँक घेतलेल्या पैशावर व्याज दर आकारते.

दोघांमधील फरक

बिल, खाते विवरण

ज्या व्यक्तीकडे क्रेडिट कार्ड आहे, त्याला दर महिन्याला त्याच्या खर्चाचे बिल पाठवले जाते, ज्यात किमान आणि काही थकबाकीची रक्कम असते. डेबिट कार्डच्या बाबतीत, खातेदार थेट बचत खात्यात प्रवेश करून खर्च पाहू शकतो.

लिंक कार्ड

डेबिट कार्ड तुमच्या बचत खात्याशी जोडलेले आहे, तर क्रेडिट कार्ड तुमच्या वित्तीय संस्थेशी किंवा जारी करणाऱ्या बँकेशी जोडलेले आहे.

खर्च मर्यादा

साधारणपणे, क्रेडिट कार्ड कंपन्या क्रेडिट मर्यादा निश्चित करतात. आणि आपण त्या क्रेडिट मर्यादेपेक्षा जास्त घेऊ शकत नाही. डेबिट कार्डच्या बाबतीत, बँका दररोज रोख काढण्याची मर्यादा आणि POS खर्च मर्यादा निश्चित करतात.

व्याज

जर व्यक्ती वेळेवर रक्कम परत करू शकत नसेल तर क्रेडिट कार्ड जारीकर्ता व्याज दर आकारतो. डेबिट कार्डच्या बाबतीत, क्रेडिटवर पैसे घेतले जात नाहीत, म्हणून कोणतेही व्याज आकारले जात नाही.