Kolkata Doctor Rape-Murder : कोलकातातील महिला डॉकरच्या रेप आणि हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशात उमटले असून याचा तपास आता सीबीआयकडे (CBI) सोपवण्यात आला आहे. आता आरजी कर मेडिकल कॉलेजच्या (RG Kar Medical College) एका डॉक्टरने मोठा दावा केला आहे. मृत महिला डॉक्टरबरोबर आधी मारहाण करण्यात आली, त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा दावा या डॉक्टरने केला आहे. मारहाण करण्याऱ्या आरोपींमध्ये एक मुलीचाही समावेश असल्याचं या डॉक्टरचं म्हणणं आहे. तसंच हा पुर्ण कट कॉलेचे प्रिन्सिपल, वरिष्ठ डॉक्टर आणि संबंधित विभागातील प्रमुखांबरोबर इतर काही लोकांनी मिळून रचला होता, हे सर्व एक मोठं रॅकट चालवत असल्याचा गंभीर आरोपही या डॉक्टरने केला आहे. मृत महिला डॉक्टरला थीसिस जमा करण्याच्या नावाखाली टॉर्चर केलं जात होतं, असा दावाही या डॉक्टरने केलाय.
या प्रकणी एका आरोपीला अटक करण्यात आलं आहे. पण या प्रकरणात आणखी किती जणांचा समावेश होता, याचा शोध घेतला जात आहे. यादरम्यान आरजी कर मेडिकल कॉलेजच्या एका महिला डॉक्टरची ऑडिओ क्लिप (Audio Clip Viral) व्हायरल झाली आहे. यात या महिला डॉक्टरने रेप आणि मर्डर प्रकरणात कॉलेजचे प्रिन्सिपल आणि इतर स्टाफवर गंभीर आरोप केले आहेत.
पास करण्यासाठी पैसे
व्हायरल होणाऱ्या या ऑडिओ क्लीपमध्ये महिला डॉक्टरने सुरुवातील घडलेल्या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. पुढे ती म्हणते 'मित्रांकडून मला आरजी कर मेडकिल कॉलेजमधली घटना समजली. मला यावर विश्वास बसत नाहीए. पश्चिम बंगलाच्या जवळपास कर्व सरकारी मेडिकल कॉलेजचे प्रिन्सिपल, विभाग प्रमुख विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी पैशांची मागणी करतात. विद्यार्थ्यांना घाबरवलं जातं, पैसे दिले नाहीत तर थीसिस जमा करुन घेतली जाणार नाही, इंटर्न, कम्पीलिशन सर्टिफिकेट मिळणार नाही, तसंच डॉक्टरीचं रजिस्ट्रेशनही होणार नाही असं सांगितलं जातं'
मेडिकल कॉलेजमध्ये रॅकेट
व्हायरल व्हिडिओत या महिला डॉक्टरने संदी घोषचं नाव घेतलं आहे. आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर संदीप घोषचं मोठं रॅकेट असल्याचा आरोप तीने केलाय. काही इंटर्न, हाऊस स्टाफ यांच्या मार्फत हे रॅकेट चालवलं जातं. याशिवाय ते सेक्स रॅकेट आणि ड्रग्स रॅकटही चालवतात. कमी किंमतीत मिळणारी औषधं ड्रग्स म्हणून बाहेर विकली जातात. करोडो रुपयांचं ट्रेंडर निघतं, यात या रॅकेटचं कमिशन असतं असा गंभीर आरोपही या ऑडिओ क्लीपमध्ये करण्यात आला आहे.
मृत महिलेला दिली जात होती धमकी
ऑडिओतल्या महिला डॉक्टरने मृत महिला डॉक्टर ही चांगली मुलगी होती, तिला वारंवार धमकी दिल्या जात होत्या, थीसिस पूर्ण करु दिलं जाणार नाही असं तिला सांगण्यात येत होतं. याविरोधात आवाज उठवण्याचा निर्णय मृत महिला डॉक्टरने घेतला होता, या सर्वांचा तिला पर्दाफाश करायचा होता, हे सर्व गेल्या सहा महिन्यांपासून सुरु होतं, तिला त्रास देण्यासाठी सातत्याने तिला रात्रपाळीला ठेवलं जात होतं. धक्कादायक म्हणजे हा सर्व प्रकार विभाग प्रमुख, सीनिअर पीजी, नर्स हेड या सर्वांना माहित होतं, असा दावाही करण्यात आला आहे.
त्या रात्री चार जणांचं एकत्र जेवण
सहा महिने त्या मुलीला त्रास दिला जात होता, त्यानंतर कट रचून तिला संपण्यात आलं. ज्या सेमिनार हॉलमध्ये हा सर्व प्रकार घडला, त्यात अनेक सीनिअर डॉक्टर्स आणि इतर लोकं आराम करण्यासाठी जातात. ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी मृत महिला डॉक्टरला आराम करण्यासाठी एकटिलाच तिथ पाठवण्यात आलं. जाणूनबुजून तिला एकटं ठेवण्यात आलं. त्यावेळी कोणालाही तिथे जाऊ दिलं नाही, सेमिनार हॉलमध्ये काम सुरु असल्याचं इतरांना सांगण्यात आलं. घटनेच्या आधी चार जणांनी तिच्याबरोबर एकत्र जेवण केलं. यात एका मुलीचाही समावेश होता.
सेमिनार हॉलमध्ये हे सर्व जण जेवत असताना त्यांच्यात भांडणं झाली. त्यावेळी त्यातल्या मुलीने पीडितेला धमकी दिली. त्यानंतर ती तिथून गेली आणि आपल्या इतर सहकाऱ्यांबरोबर दारू प्यायली आणि पुन्हा सेमिनार हॉलमध्ये येऊन पीडित मुलीवर हल्ला केला. दोघांनी तिचे हात पकडले, यात इंटर्न मुलीनेही त्यांना मदत केली असा आरोप ऑडिओत करण्यात आला आहे.
या हल्ल्यात मृत महिला डॉक्टरला अनेक ठिकाणी जखमा झाल्या. मारहाण केल्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आला. त्यानंतर तिचा गळा दाबून तिची हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर हे सर्वजण सेमिनार हॉलच्या बाहेर आले, तिथे अटक करण्यात आलेला आरोपी संजय रॉय हा दारू पित होता, त्याला या लोकांनी सेमिनार हॉलमध्ये काम असल्याचं सांगून पाठवलं. तिथे गेल्यानतंर संजयने मृतदेहवर अत्याचार केला आणि तिथून गेला, असा धक्कादायक दावा या ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आला आहे.