नवी दिल्ली : रामनाथ कोविंद हे देशाचे १४वे राष्ट्रपती झाले आहेत. एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांचा पराभव केला आहे.
यामध्ये कोविंद यांना ६५.३४ टक्के मते मिळाली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी आणि संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) उमेदवार मीरा कुमार यांना एकूण ३४.३५ टक्के मते मिळाली.
या निवडणुकीसाठी विविध राज्यांतील ४१२० आमदार आणि ७७६ खासदारांना मतदान करण्याचा अधिकार होता. त्यापैकी ९९ टक्के आमदार-खासदारांनी १७ जुलै रोजी मतदानाचा हक्क बजावला होता.
भारताच्या आत्तापर्यंतच्या तेरा राष्ट्रपतींपैकी राजेंद्र प्रसाद हे सर्वात जास्त काळ म्हणजेच १९५० ते १९६२ अशी १२ वर्ष देशाचे राष्ट्रपती होते. तर झाकीर हुसेन हे सर्वात कमी काळ १९६७-१९६९ अशी दोनच वर्ष राष्ट्रपती होते.
राष्ट्रपती | वर्ष | |
१४ | रामनाथ कोविंद | २०१७ |
१३ | प्रणब मुखर्जी | २०१२-२०१७ |
१२ | प्रतिभाताई पाटील | २००७-२०१२ |
११ | ए.पी.जे. अब्दुल कलाम | २००२-२००७ |
१० | के.आर.नारायणन | १९९७-२००२ |
९ | शंकर दयाळ शर्मा | १९९२-१९९७ |
८ | आर.व्यंकटरमण | १९८७-१९९२ |
७ | झैल सिंग | १९८२-१९८७ |
६ | नीलम संजीव रेड्डी | १९७७-१९८२ |
५ | फखरुद्दीन अली अहमद | १९७४-१९७७ |
४ | व्ही.व्ही.गिरी | १९६९-१९७४ |
३ | झाकीर हुसेन | १९६७-१९६९ |
२ | सर्वपल्ली राधाकृष्णन | १९६२-१९६७ |
१ | राजेंद्र प्रसाद | १९५०-१९६२ |