पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्यावर ध्वजारोहण

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिनानिमित्तानं देशवासीयांना शुभेच्छा दिल्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्यावर ध्वजारोहण  title=

मुंबई : 72 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी लालकिल्यावरून देशातील नागरिकांना संबोधित करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी राजघटावर पोहोचताच त्यांनी महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पित केली. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी पाचव्यांदा लाल किल्यावरून देशातीव नागरिकांशी संवाद साधणार आहेत. असा अंदाज लावण्यात येत आहे की, या 72 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्यावरून अनेक योजनांची घोषणा करतील. 

ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाआधी कवायत करण्यात आली यावेळी लोकांनी मोठी गर्दी केली आहे. लाल किल्ल्यावरूनच मोदी पाचवं आणि शेवटचं भाषण करत आहेत. तिन्ही सेना दलांचे प्रमुख या सोहळ्याला उपस्थित आहेत. लाल किल्ला परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.  तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून स्वातंत्र्यदिनानिमित्तानं देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील काही महत्वाचे मुद्दे

देशाचा शेतकरी मोठ्या प्रमाणात ट्रकची मागणी करत आहे.

कधी नव्हे ते देशात मोठ्या प्रमाणात विमानांची खरेदी करताना दिसत आहे.

भारत जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था गेल्या 4 वर्षांत शौचालय बनवण्यात मोठं यश