इंदौर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच लोकसभा स्पीकर सुमित्रा महाजन यांची स्तुती केली आहे. भाजपामध्ये केवळ महाजनच अशा आहेत ज्या मला ओरडू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इंदौर येथे बोलत होते. लोकसभा स्पीकर म्हणून ताईंनी कुशलता आणि संयमीपण काम संभाळले. त्यामुळे त्यांनी सर्वांवर स्वत:ची अशी छाप सोडली आहे. तुम्ही सर्व मला पंतप्रधान म्हणून ओळखता पण खूप पार्टीत मला कोणी ओरडू शकत असेल तर त्या ताई आहेत.
मी आणि ताईंनी भाजपा संघटनेचे कार्य केले आहे. त्यामुळे कार्याप्रती त्यांचे समर्पण मी पाहीले आहे. त्यामुळे इंदौरच्या विकासातील ताईंचे कोणतेही स्वप्न अपूर्ण राहणार नाही असे मी अश्वासन देतो. सुमित्रा महाजन (76) इंदौरच्या जागेहून 1989 ते 2014 दरम्यान सलग आठ वेळा निवडणूक जिंकल्या आहेत. पण 75 वर्षाहून अधिक वयाच्या नेत्यांना निवडणूक लढण्याचा भाजपाचा नियम आहे. त्यानंतर सुमित्रा महाजन यांनी आपण निवडणूक लढणार नसल्याचे स्वत: हून जाहीर केले होते.
खूप चर्चेनंतर भाजपाचे स्थानिक नेते शंकल लालवानी (57) यांना महाजन यांचे उत्तराधिकारी बनवून इंदौरमधून उमेदवारी देण्यात आली. इंदौर विकास प्राधीकरण (आईडी) चे चेअरमन आणि इंदौर नंगर निगमचे सभापती राहिलेले लालवानी आपल्या राजकीय कारकिर्दीतील पहिली निवडणूक लढत आहेत.
इंदौर लोकसभा क्षेत्रात 19 मे ला मतदान होणार आहे. या ठिकाणी लालवानी आणि काँग्रेस उमेदवार पंकज संघवी यांच्यात लढत होणार आहे. इथे साधारण 23.5 लाख मतदार आहेत.