close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

पंजाबमधल्या प्रचारादरम्यान राहुल गांधींची ट्रॅक्टर सवारी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी यांचा पंजाबमधल्या प्रचारात वेगळाच अंदाज पहायला मिळाला.

Updated: May 16, 2019, 12:13 PM IST
पंजाबमधल्या प्रचारादरम्यान राहुल गांधींची ट्रॅक्टर सवारी

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी यांचा पंजाबमधल्या प्रचारात वेगळाच अंदाज पहायला मिळाला. यावेळी राहुल गांधी ट्रॅक्टर चालवताना दिसून आले. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह हे देखील यावेळी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यांत १९ मे रोजी पंजाबमध्ये मतदान होणार आहे. पंजाबमध्ये एकूण १७ जागा आहेत. या सर्व जागांवर एकसाथ मतदान होणार आहे. 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज राजस्थानच्या अल्वरमधल्या बलात्कार पीडित महिलेच्या कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. काल खराब हवामानामुळे राहुल गांधींना अल्वरचा दौरा रद्द करावा लागला होता. अल्वरमध्ये दाखल झाल्यानंतर राहुल गांधी उत्तरप्रदेशातील कुशीनगर, बिहारच्या पाटलीपुत्र मतदार संघात लालूप्रसाद यादव यांच्या कन्या मीसा भारती यांच्या प्रचारासाठी सभा आणि रोड शो करणार आहेत. मीसा भारतींच्या विरोधात लालूप्रसाद यादव यांचे भाऊ रामकृपाल यादव यांना भाजपाने तिकीट दिले आहे. पुतणी विरुद्ध काका अशा या लढतीकडे साऱ्या देशाचे लक्ष लागून राहिले आहे.