Loksabha Elections 2024 Results Latest News: लोकसभा निवडणुकीदरम्यान सुरु असणारी मतदान प्रक्रिया पूर्ण होऊन आता निकालाचा दिवस अवघ्याकाही तासांवर येऊन ठेपला आहे. यंदाच्या वर्षी देशात कोणाची सत्ता येणार इथपासून (PM Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा या पदी विराजमान होणार का, हे आणि अनेक प्रश्न या निकालांपूर्वी उपस्थित केले जात आहेत. दरम्यान नुकत्याच आलेल्या इंडिया न्यूज-डी-डायनॅमिक्सच्या (Exit Polls) एक्झिट पोलनुसार देशात एनडीए तिसऱ्यांदा सत्तेत येण्याची शक्यता असून हेएनडीए आघाडीला 371 जागा जिंकण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर इंडिया आघाडीला 125 जागांवर समाधान मानावं लागणार आहे. इतर पक्षांच्या वाट्याला 47 जागा जातील.
एक्झिट पोलची आकडेवारी पाहता देशात पुन्हा एकदा एनडीएचीच सत्ता येणार असल्याची स्पष्ट चिन्हं दिसत असून, कथित स्वरुपात भाजप नेके आणि पक्षाताली वरिष्ठ मंडळी याच आठवड्याच्या अखेरपर्यंत हा विजय साजरा करण्याचा बेत आखत असल्याचं म्हटलं जात आहे. यामध्ये पंतप्रधानांच्या शपथविधीसारख्या औपचारिक कार्यक्रमांचाही समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या माहितीनुसार मंगळवारच्या मतमोजणीआधी राष्ट्रपती सचिवालयातून 28 मे रोजीच राष्ट्रपती भवनामध्ये पंतप्रधान आणि इतर मंत्र्यांच्या शपथ ग्रहण समारंभासाठीच्या सजावटीसाठीचं टेंडर जारी करण्यात आलं होतं. प्राथमिक माहितीनुसार 21.97 लाख रुपये इतकी किंमत असणारं हे टेंडर 3 जून रोजी उघडण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान टेंडरमधील मागण्या पूर्ण करण्यासाठी ठेकेदारांना 5 दिवसांचा वेळ दिला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
देशातील सत्ताधारी पक्ष अर्थात कथित स्वरुपात भाजपचा हा राजकीय स्वरुपातील औपचारिक समारंभ कर्तव्य पथ किंवा भारत मंडपम येथे पार पडण्याची शक्यता आहे. सदर कार्यक्रमामध्ये भारतीय संस्कृतीचं दर्शन घडणार असून संगीत आणि रोषणाईच्या कार्यक्रमांचंही आयोदन केलं जाण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. देश- विदेशातील जवळपास हजारो पाहुण्यांची या सोहळ्यासाठी पाहायला मिळण्याची शक्यता असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हवाला देत इंडियन एक्स्प्रेसनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार 9 जून 2024 रोजी हा कार्यक्रम पार पडू शकतो. दरम्यान, त्यासंदर्भातील कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर येऊ शकलेली नाही.
लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया 7 टप्प्यांमध्ये पार पडली असून, इंडिया टुडे-एक्सिस माय इंडियानं या निवडणुकीमध्ये भाजप- एनडीएला 361 ते 401 जागांवर तर, इंडिया आघाडीला 131 ते 166 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. तर, एबीपी-सी वोटरच्या अनुषंगानं एनडीएला 353-383 आणि विरोधी गटात असणाऱ्या इंडिया आघाडीला 152-182 जागा मिळण्याची शक्यता आहे.
एक्झिट पोलची आकडेवारी तंतोतंत ठरल्यास देशात पुन्हा मोदींची सत्ता अटळ आहे. यासोबतच यानिमित्तानं देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पक्षाला तिसऱ्यांदा निवडणुकांमध्ये विजय मिळवून देण्याच्या विक्रमाची बरोबरीसुद्धा मोदी करतील.
RWA
(20 ov) 125/5
|
VS |
BRN
126/3(18.1 ov)
|
Bahrain beat Rwanda by 7 wickets | ||
Full Scorecard → |
MAW
(20 ov) 139/7
|
VS |
BRN
140/1(15.1 ov)
|
Bahrain beat Malawi by 9 wickets | ||
Full Scorecard → |
QAT
(20 ov) 189/4
|
VS |
SDA
193/6(19.2 ov)
|
Saudi Arabia beat Qatar by 4 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.