या एका मतदारसंघात ३ टप्प्यात होणार निवडणूक

निवडणूक आयोगाने रविवारी संध्याकाळी लोकसभा निवडणुकीची घोषणा केली.

Updated: Mar 11, 2019, 03:46 PM IST
या एका मतदारसंघात ३ टप्प्यात होणार निवडणूक title=

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने रविवारी संध्याकाळी लोकसभा निवडणुकीची घोषणा केली. जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग लोकसभा मतदारसंघ सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. कारण पहिल्यांदा एका जागेसाठी तीन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. अनंतनागमधील सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

जम्मू-कश्मीरमध्ये लोकसभेचे एकूण 6 जागा आहेत. येथे 5 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. 

11 एप्रिल : बारामूला, जम्मू
18 एप्रिल : श्रीनगर, उधमपूर
23 एप्रिल : अनंतनाग (अनंतनाग जिल्हा)
29 एप्रिल : अनंतनाग ( कुलगाम जिल्हा)
6 मे  : लद्दाख, अनंतनाग ( शोपिया जिल्हा)

जम्मू-काश्मीरमध्ये लोकसभेसह विधानसभा निवडणुका देखील होणार होत्या. पण सुरक्षेच्या कारणास्तवर हा निर्णय मागे घेण्यात आला. या निर्णयानंतर नॅशनल कान्फ्रेंस(एनसी) आणि पीपुल्स डेमोक्रेटिक पार्टी (पीडीपी) ने केंद्र सरकारवर टीका केली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी म्हटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तान, दहशतवादी आणि कट्टरतावादी यांच्यासमोर आत्मसमर्पण केलं आहे. पीडीपी अध्यक्षा महबूबा मुफ्ती यांनी म्हटलं की, जम्मू-काश्मीरमध्ये फक्त लोकसभा निवडणूक करणं हा भारत सरकारची कुटनीती आहे. जनतेला सरकार न निवडू देणं गे लोकशाहीच्या विरोधात आहे.

14 फेब्रुवारीनंतर प्रशासन हाय अलर्टवर आहे. सीमाभागात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दोन्ही निवडणुका एकत्र घेतल्यास उमेदवारांच्या सुरक्षेचा प्रश्न असतो. ज्यामध्ये अधिक प्रमाणात सुरक्षा जवान तैनात करावे लागतात.

लोकसभेच्या निवडणुकीत प्रादेशिक पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. सपा-बसपा, टीएमसी, बीजेडी, टीडीपी, वायएसआर काँग्रेस आणि टीआरएस सारखे पक्ष किंगमेकर ठरणार आहेत. बहुमतासाठी 272 जागा आवश्यक आहेत.