Loksabha Election 2024 : लोकशाहीचा उत्सव म्हणून भारतातील निवडणुकांकडे पाहिलं जातं. पण, याच लोकशाहीमध्ये सध्या क्षणाक्षणाला अनेक बदल घडताना दिसत आहेत. अवघ्या काही दिवसांवर देशातील लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होणार आहे. त्यातच आता सत्ताधारी (BJP) भाजपकडून सर्व स्तरांतून विरोधकांवर निशाणा साधण्याचे प्रयत्न सुरु आहेत. भाजपनं निवडणुकीसाठीची जाहिरातबाजीसुद्धा काहीशा अशाच शैलीत केली जिथं पक्षानं उपरोधिकपणे कोणाचंही नाव घेता शिताफीनं INDIA आघाडीवर निशाणा साधला.
भाजपच्या या जाहिरातीमध्ये INDIA आघाडीत सहभागी झालेल्या विविध पक्षांचे नेते आणि लोकप्रिय चेहऱ्यांची नक्कल करणारी पात्र पाहायला मिळत आहेत. पाहताक्षणी इथं राहुल गांधी, लालू प्रसाद यादव, अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे अशा मंडळींची नक्कल केली जात असल्याचं लक्षात येत आहे. तर, त्यांच्यासमोर एक स्त्री पात्र वधूच्या वेशात बसलं आहे. समोर बसलेली मंडळी परपक्षातील असून प्रत्येकजण बोहल्यावर चढण्यासाठी उत्सूक असल्याचं जाहिरातीत दाखवलं गेलं आहे. थोडक्यात योग्य वर या स्त्री पात्राला निवडता येणार का? अशा आशयाची वातावरणनिर्मिती या जाहिरातीतून करण्यात आली आहे.
भाजप समर्थकांनी ही जाहिरात अनेक ठिकाणी शेअर केली असली तरीही विरोधी बाकावर असणाऱ्यांनी मात्र सत्ताधाऱ्यांच्या या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. 'विवाहसंस्था ही एक पवित्र प्रथा असून, प्रेम आणि विश्वासावरच हे नातं उभं असतं. रक्ताच्या नात्याहून या नात्याचा पाया भक्कम असतो. पण, आज भाजपनं या आक्षेपार्ह जाहिरातीच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्यांची संकुचित विचारसरणी सर्वांसमोर आणली', असं म्हणत काँग्रेस प्रवक्त्या Supriya Shrinate यांनी भाजपवर निशाणा साधला.
देखिए...
I.N.D.I. अलायंस में Fight,
मैं ही दूल्हा हूं Right. pic.twitter.com/h0kS4dLW3B
— BJP (@BJP4India) March 26, 2024
The latest BJP ad is a pathetic example of how they look at women’s role in society. The typical stereotype of a woman being all dolled up to impress a groom in an arranged marriage setting.
That’s how they see an Indian voter- a woman seeking a groom rather than a government.…— Priyanka Chaturved (@priyankac19) March 27, 2024
शिवसेनेच्या ठाकरे (Shivsena) गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनीसुद्धा भाजपच्या महिलांकडे पाहण्याच्या दृष्टीकोनावर निशाणा साधत, लग्न ठरवण्याचा प्रसंग दाखवत भारतीय मतदारांकडे ही मंडळी असंच पाहत आहेत अशा शब्दांत टीका केली. सोशल मीडियावर सध्या भाजपच्या या जाहिरातीला व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून, त्यावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.