अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

मध्य प्रदेशात महिलांवर होणारे अत्याचार थांबताना दिसत नाहीये. आता पुन्हा एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Jan 11, 2018, 11:16 PM IST
अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार title=
Representative Image

भोपाळ : मध्य प्रदेशात महिलांवर होणारे अत्याचार थांबताना दिसत नाहीये. आता पुन्हा एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

अल्पवयीन तरुणीवर बलात्कार

टीकमगढ येथील १४ वर्षीय तरुणीवर गावातीलच चार तरुणांनी सामूहिक बलात्कार केला आहे. पीडित तरुणीची प्रकृती गंभीर असून तीला उपचाराकरीता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

तीन आरोपी अटकेत

पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली असून अद्यापही एक आरोपी फरार आहे. फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

महिलांवर होणारे अत्याचार सुरुच

मध्य प्रदेशात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांत वाढ होताना दिसत आहे. गेल्या वर्षी राज्य सरकारने महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदा बनवण्यास मंजुरी दिली होती. मात्र, तरिही बलात्काराच्या घटना सुरुच आहे.