टिफिन बॉक्स उलटा ठेवून पेटवला सुतळी बॉम्ब; पोटात स्टीलचे तुकडे घुसल्याने तरुणीचा गेला जीव

स्फोट इतका भयंकर होता की टिफिन बॉक्सचे तुकडे झाले

Updated: Oct 28, 2022, 11:55 AM IST
टिफिन बॉक्स उलटा ठेवून पेटवला सुतळी बॉम्ब; पोटात स्टीलचे तुकडे घुसल्याने तरुणीचा गेला जीव title=

मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) मंदसौरमध्ये दिवाळीच्या (Diwali) दिवशीच भीषण अपघात झाला. या अपघातामुळे सणासुदीच्या काळात एका कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. फटाके (firecrackers) फोडताना एका मुलीला आपला जीव गमवावा लागलाय. बुधवारी टिफिन बॉक्स (Tiffin Box) उलटा ठेवून बॉम्ब फोडणे एका 19 वर्षीय तरुणीला महागात पडले. बॉम्ब (Bomb) फोडल्यामुळे टिफिनचे तुकडे झाले आणि त्याचे तुकडे मुलीच्या शरीरात घुसले आणि तिचा मृत्यू झाला. स्थानिक पोलीस ठाण्याचे प्रभारी अरविंद सिंह राठोड यांनी सांगितले की, ही घटना कर्जू गावात घडली जेव्हा मृत मुलगी तिच्या घराबाहेर फटाके (firecrackers) फोडत होती.

मुलीने सुतळी बॉम्बवर (Bomb) स्टीलचा टिफिन-बॉक्स (Tiffin Box) उलटा ठेवला होता. मात्र, फटाक्याचा स्फोट होताच स्टीलच्या टिफिनचे तुकडे झाले आणि ते पोटासह शरीरात घुसले. त्यानंतर मुलीला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलगी रतलाम येथील एका खासगी महाविद्यालयातून फार्मसीचे शिक्षण घेत होती. याशिवाय तिने ब्युटी पार्लरमध्येही काम केले होते.  तीन भावंडांमध्ये ती सर्वात मोठी होती. तिचे वडील शेती करतात. या घटनेने कुटुंबियांच्या दिवाळी आनंदाचे रूपांतर शोकात झाले आहे. स्फोटानंतर मुलगी जागेवरच कोसळली. कुटुंबीय आणि गावातील लोकांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले. मात्र त्याआधीच मुलीचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली. घटनेनंतर पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून प्रकरणाचा तपास सुरू केला. फटाके फोडताना निष्काळजीपणाने या मुलीचा जीव घेतला.

दरम्यान, मध्य प्रदेशात आणखी एका ठिकाणी फटाके फोडताना काचेची बाटली फुटून 7 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. या घटनेच एक 13 वर्षीय मुलगागी गंभीर जखमी झाला आहे. मृताच्या नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही बिओरा मांडू गावात घरासमोर फटाके फोडत होते. त्यानंतर अचानक फटाका काचेच्या बाटलीवर पडला, त्यामुळे मुलगा आणि मुलगी दोघेही गंभीर जखमी झाले.