भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये सत्ताधारी भाजपला निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. शिवराज चौहान यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील हायप्रोफाईल मंत्री अर्चना चिटनीस यांनाही पराभव पत्कारावा लागला. त्यानंतर त्यांनी जनतेचे आभार घेण्यासाठी एक सभा घेतली. बुधवारच्या सभेत त्यांनी जे भाष्य केले त्यानंतर उपस्थित लोक थक्कच झालेत. त्यानंतर सभेच एकच चर्चा सुरु होती.
अर्चना यांनी सांगितले, सत्तेत असताना जशी माझी भूमिका होती. तशीच माझी भूमिका सत्तेबाहेर राहून मी निभावणार आहे. ही भूमिका अधिक चांगली निभावणार आहे. ज्या लोकांनी मला मतदान केले त्यांची मान खाली जाणार नाही. मात्र, ज्या लोकांनी चुकून किंवा बाहेरच्या लोकांचे ऐकून तसेच भीतीने मला मतदान केले नाही, त्यांना मी चांगलेच रडवणार आहे. अन्यथा माझे नाव अर्चना चिटनीस नाही आणि त्यांना आता चांगलाच पश्चात्ताप होईल.
बूरहानपूर जिलह्यातील दोन्ही विधानसभा जागा बूरहानपूर आणि नेपानगरमध्ये भाजप उमेदवाराच्या पराभवालाबुरहानपूर जिल्ह्यातील दोन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये बुरहानपूर आणि नेपाणगरमधील भाजपच्या उमेदवारांनी मिळवलेल्या मतांमध्ये नोटाची मते जास्त होती. बुरहानपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार अर्चना चिटणीस या ठाकूर सुरेंद्र सिंग यांच्याकडून 5120 मतांनी पराभूत झाल्यात. बुरहानपूर विधानसभा मतदारसंघात एकूण 5724 नोटाची मते मिळालीत. ही परिस्थिती नेपानगर विधानसभा मतदारसंघातही दिसून आली. येथे भाजप उमेदवाराचा पराभव काँग्रेस उमेदवार सुमित्रा कास्डेकर यांनी 1265 मतांना केला. येथे नोटाची मते 2552 पडलीत.
याविधानानंतर अर्चना चिटणीस यांचीशी संपर्क साधला त्यावेळी त्या म्हणाल्यात, लोकशाहीवर माझा विश्वास आहे. परंतु अनिश्चितता लोकशाहीला लाभ देत नाही. लोक कोणालाही मत देऊ शकतात. संसदीय लोकशाही समजणाऱ्यांसाठी आणि विश्लेषण करणाऱ्यांसाठी हा एक महत्त्वाचे विषय आहे.