भोपाळ: गेल्या काही दिवसांपासून मध्य प्रदेशात सुरु असलेले राजकीय नाट्य निर्णायक वळणावर येऊन ठेपले आहे. राज्यपाल लालजी टंडन यांनी शनिवारी रात्री काँग्रेस सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सोमवारी मध्य प्रदेश विधानसभेत कमलनाथ सरकारकडून विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल. यावेळी बहुमत सिद्ध करून सत्ता कायम राखण्याचे मोठे आव्हान कमलनाथ सरकारपुढे असेल.
ज्योतिरादित्य यांच्या अडचणीत होणार वाढ, कमलनाथ उघडणार 'ही' फाईल्स
मध्य प्रदेशातील काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे ही राजकीय उलथापालथ सुरु झाली होती. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसच्या २२ आमदारांनी राजीनामे दिले होते. त्यामुळे कमलनाथ यांचे सरकार अल्पमतात येण्याची शक्यता आहे. मात्र, कमलनाथ यांनी आपण बहुमत चाचणीसाठी तयार असल्याचे सांगत भाजपविरोधात दंड थोपटले होते.
Madhya Pradesh Governor Lalji Tandon: Floor test in #MadhyaPradesh Assembly to be held on March 16. pic.twitter.com/OFDsnLkSt8
— ANI (@ANI) March 14, 2020
मध्य प्रदेश विधानसभेत एकूण २३० जागा आहेत. यामध्ये काँग्रेसचे ११४ तर भाजपचे १०९ आमदार आहेत. तर समाजवादी पक्षाचा एक, बसपाचे दोन आणि चार अपक्ष आमदार आहेत. यापूर्वी सपा, बसप आणि अपक्ष आमदारांचा काँग्रेसला पाठिंबा होता. मात्र, ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या राजीनाम्यानंतर ही समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. दरम्यान, काँग्रेसकडून शनिवारी आपल्या आमदारांसाठी व्हीप जाहीर करण्यात आला. विधानसभेत उपस्थित राहून सरकारच्या बाजूने मतदान करण्याचा आदेश आमदारांना देण्यात आला आहे.
'ज्योतिरादित्य कधीही माझ्या घरी येऊ शकत होते', राहुल गांधींनी मौन सोडलं