आताची सर्वात मोठी बातमी! शिवसेना शिंदेंची की ठाकरेंची? 17 जानेवारीला फैसला

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षातली आताची सर्वात मोठी बातमी, पक्ष कोणाचा, धुनष्यबाण चिन्ह कोणाचं याचा फैसला अखेर होणार

Updated: Jan 13, 2023, 06:50 PM IST
आताची सर्वात मोठी बातमी! शिवसेना शिंदेंची की ठाकरेंची? 17 जानेवारीला फैसला title=

रामराजे शिंदे, झी मीडिया दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुप्रिम कोर्टात (Supreme Court) महत्त्वाची सुनावणी सुरु आहे. सुप्रिम कोर्टात 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात तर निवडणूक आयोगात धनुष्यबाण चिन्हं (Dhanushban Symbol) कोणाला मिळणार यावर सुनावणी सुरु आहे. याप्रकरणी गेल्या काही महिन्यात केवळ तारीख पे तारीख सुरु होती. पण आता शिवसेना (Shivsena) कोणाची याचा फैसला होण्याची शक्यता आहे. 

17 जानेवारीला फैसला होणार
शिवसेना कोणाची याचं भवितव्य 17 जानेवारीला ठरणार आहे. शिवसेना ठाकरे गटाची (Thackeray Group) कि शिंदे गटाची (Shinde Group) याचा अंतिम निर्णयच निवडणूक आयोग 17 जानेवारीला देणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी झी २४ तासला दिलीय. एवढंच नव्हे तर निवडणूक आयोग शिंदे गटाला कौल देण्याची शक्यता असल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय. 

कोर्टात युक्तीवाद पूर्ण
याप्रकरणात सर्व युक्तीवाद पूर्ण झाला असून कागदपत्रही कोर्टात जमा झाली आहेत. आता केवळ ठाकरे गटाचा युक्तीवाद बाकी आहे. त्यानंतर फैसला होणार आहे. मंगळवारी म्हणजे 17 जानेवारीला धनुष्यबाण चिन्हा कोणाला मिळणार आणि शिवसेना कोणाची याचा निर्णय सुनावला जाईल. सध्यातरी शिंदे गटाचं पारडं जड आहे. यासाठी सादिक अली केसचा संदर्भ देण्यात आला आहे. आमदार आणि खासदार ज्याच्याकडे जास्त त्यांच्या कडे पक्ष अशाप्रकारची भूमिका मांडण्यात आली आहे. 

19 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी एक मोठा कार्यक्रम घेतला जाणार आहे. यानिमित्ताने मोठं शक्तीप्रदर्शन केलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

आत्तापर्यंत कोणी किती कागदपत्र सादर केली ते पाहूया
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 
182 राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य
प्रतिज्ञापत्र 3 लाख (जिल्हा प्रमुख ते गटप्रमुख)
प्राथमिक सदस्य 20 लाख
एकूण कागदपत्र 23 लाख 182

बाळासाहेबांची शिवसेना
खासदार 13
आमदार 40
संघटनात्मक प्रतिनिधी 711
स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधी-2046
प्राथमिक सदस्य 4,48,318
शिवसेना राज्यप्रमुख 11
एकूण 4 लाख 51 हजार 139