Edible Oil Price: खाद्यतेलाच्या दरांबाबत सरकारचा मोठा निर्णय; वाचून धाडकन उठून बसाल

बातमी काहीसा दिलासा देणारी

Updated: Jun 23, 2022, 11:26 AM IST
Edible Oil Price: खाद्यतेलाच्या दरांबाबत सरकारचा मोठा निर्णय; वाचून धाडकन उठून बसाल  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

नवी दिल्ली : सातत्यानं वाढत्या महागाईमध्येच आता सरणाऱ्या प्रत्येक दिवशी सर्वसामान्यांना काही अंशी दिलासा मिळताना दिसत आहे. सध्या समोर येणारी बातमीही सर्वसामान्यांच्या आयुष्यावर थेट परिणाम करणारी आहे. मुळात परिणाम करण्यापेक्षा ही बातमी काहीसा दिलासा देणारी आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. 

आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर घटल्यामुळं आणि सरकारी हस्तक्षेपामुळं आता किरकोळ बाजारातही खाद्यतेलाचे दर कमी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

खाद्य सचिव सुधांशू पांडे यांच्या माहितीनुसार जून महिन्याच्या सुरुवातीला देशभरात शेंगदाण्याचे दर वगळता इतर खाद्यतेलांच्या किरकोळ दरात 15 ते 20 रुपयांची घट पाहण्यास मिळाली आहे. सध्या हे दर 150 ते 190 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहेत. यापूर्वी हेच दर 200 रुपयांच्या घरात होते. (major brands cut down Edible Oil Price)

लवकरच येणार नव्या दरांचं उत्पादन 
अदानी विल्मर (Adani Wilmar) आणि मदर डेअरी (Mother Dairy) या दोन्ही कंपन्यांकडून त्यांच्या विविध प्रकारच्या तेलांचे दर मागील आठवड्यातच कमी केले होते. यादरम्यानच नवे दर लागू असणारा मालही बाजारात आला. येत्या काळात ग्राहकांना ही उत्पादनं मिळू शकतील. 

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये दोन सत्रांच धाडसत्र चालवण्यात आली. याचेही तेलाच्या दरांवर परिणाम दिसून येत आहेत. तेलाचा काळाबाजार या कारवाईतून समोर आला होता. 

पीठांचे दरही कमी 
सुधांशू पांडे यांच्या माहितीनुसार इतर राष्ट्रांच्या तुलनेत भारतात पीठांचे दरही कमी झाले आहेत. गेल्या काही दिवसांमध्येच ही घट पाहायला मिळाली आहे. सरकारनं उचललेल्या काही महत्त्वाच्या पावलांमुळंच हे शक्य झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून भारत सरकारकडून गव्हाच्या पीठाच्या दरांवर सरकारचंही लक्ष असल्याची माहिती आता समोर येत आहे.