Makar Sankranti 2023: गुळाची पोळी आणि त्यावर साजूक तुपाची धार असा झकास बेत संक्रांतीच्या दिवशी असतोच. पण खवय्यांसाठी संक्रांतीइतकेच (Makat Sankranti Special Food) किंबहुना त्यापेक्षाही अधिक महत्त्वाचे असते ते भोगीच जेवण. संक्रांतीच्या (Makar Sankranti 2023) आदल्यादिवशी म्हणजेच आज (14 जानेवारी 2023) भोगीचा सण साजरा केला जातो. महिलांच्या दृष्टिने हा दिवस महत्त्वाता असला तरी या दिवसाच्या जेवणाची प्रतिक्षा मात्र घरातल्या सगळ्यांनात असेत.
संक्रांत हा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो. सणाची नावं वेगवेगळी असली तरी सण साजरा करण्याच उत्साह मात्र तोच असतो. संक्रांतीच्या आदल्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारताच्या इतर प्रांतात भोगी साजरी केली जाते. भोगीच्या दिवशीचे जेवण महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रांतानुसार वेगवेगळ असते. जसे की, मराठवाडा, कोकण, विदर्भ, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणची हिवाळ्यातली खाद्य संस्कृती यानिमित्ताने दिसून येते.
वाचा: सुगड पूजा आणि नवरीचा ववसा म्हणजे काय? जाणून घ्या पूजा विधी, साहित्य Video च्या माध्यमातून