Viral Video : डोक्यावर घेतली गाडी आणि चढला चक्क बसच्या टपावर अन् पुढे जे घडलं ते पाहून...

सध्या हा Viral Video सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून चाहते यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. 

Updated: Nov 27, 2022, 05:32 PM IST
Viral Video : डोक्यावर घेतली गाडी आणि चढला चक्क बसच्या टपावर अन् पुढे जे घडलं ते पाहून... title=

मुंबई : सध्या सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती डोक्यावर मोटरसायकल ठेवून बसच्या पायऱ्या चढत आहे. हा व्हिडीओ खरंच आश्चर्यकार आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्यांच्या डोक्याला हात मारला आहे. ट्विटरवर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ शेअर करत नेटकऱ्यानं 'ये वाकई सुपर मॅन हैं..' असे कॅप्शन दिले आहे. दरम्यान, हा व्हिडीओ 89 हजार पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. तर 6 हजार पेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाइक केलं आहे. 

व्हिडीओमध्ये मोटारसायकल डोक्यावर ठेवून ही व्यक्ती पायऱ्यांच्या मदतीनं बसवर चढण्याआधी त्या पायऱ्यांच्या पाया पडतो आणि मग बसवर चढू लागतो. धक्कादायक गोष्ट म्हणजे बसवर चढताना त्या व्यक्तीनं मोटारसायकलला पकडलेली नाही. 

नेटकऱ्यांनी केलं कौतूक

हा व्हिडिओ पाहून लोक या व्यक्तीला सुपरमॅन म्हणत आहेत. एक नेटकरी म्हणाला की, 'मला माझी मान इतकी मजबूत बनवायची आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला की, 'हाच खरा 'बाहुबली' आहे. काही नेटकरी या व्यक्तीला सुपरमॅन म्हणत आहेत तर काही कॅप्टन अमेरिका म्हणत आहेत. काही नेटकऱ्यांनी पैशांची गरज असेल तर लोक काय काय नाही करत स्वत: च्या जीवालाही त्रास करुन घेतात. 

हेही वाचा : Anurag Kashyap डिप्रेशनचा बळी, तीन वेळा गेलाय रिहॅब अन् Heart Attack!

या व्हिडीओच्या लोकेशनबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही तरी हा व्हिडीओ झारखंडची राजधानी रांची येथील बस स्टँडमधील असल्याचे म्हटले जात आहे. रांचीचा वाहन नोंदणी कोड JH 01 ने सुरू होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसलेल्या बाइकच्या नंबर प्लेटवरून याचा अंदाज लावला जात आहे. (man climbs bus ladder with motorbike on his head viral video netizens calls him superman) 

या आधीही असे व्हिडीओ झालेत व्हायरल झाला होता

असा व्हिडिओ व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही असे अनेक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये एक 56 वर्षीय महिला हेवी वेट लिफ्टिंग करताना दिसत होती. ही महिला साडी नेसून वेटलिफ्टिंग करत होती, त्यामुळे हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याला 1.1 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले.