नवी दिल्ली : शवगृहात जाण्याचं म्हटलं तर अनेकांना धडकी भरते. याच शवगृहात एक विचित्र प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडलाय. एका मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यासाठी शवगृहात नेण्यात आलं. पोस्टमार्टमची तयारी सुरु झाली आणि मग, मृतदेहाचं पोस्टमार्टम करण्याची तयारी सुरु होती. डॉक्टर आणि स्वीपर दाखल झाले. मात्र, त्याच दरम्यान मृतकाने अचानक हात पकडला.
मृतकाने हात पकडताच घाबरुन पळापळ झाली नाही. तर, डॉक्टरांच्या परिस्थिती लक्षात आली आणि त्यांनी मृतकाला वॉर्डमध्ये नेलं. कारण, ज्याला मृतक समजून शवगृहात आणलं होतं तो तरुण जिवंत होता. सध्या या तरुणावर उपचार सुरु असुन त्याची प्रकृती स्थिर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी परासिया येथील मोआरीमध्ये एक अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्यांना उपचाराकरीता रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी डॉक्टरांनी एका तरुणाला मृत घोषित केलं. मृत घोषित केल्यानंतर त्या तरुणाला पोस्टमार्टम करण्यासाठी शवगृहात पाठवलं.
सुदैवाने पोस्टमार्टम करण्यासाठी दाखल झालेल्या डॉक्टरांच्या संपूर्ण प्रकार लक्षात आला आणि त्या तरुणाचे प्राण वाचले.