24 तासांत अमेरिकेत तिसरा हल्ला, तर न्यूयॉर्कच्या क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार, 11 जणांचा मृत्यू

अमेरिकेत 24 तासांत तिसरा हल्ला. अशातच आता न्यूयॉर्कमधील नाईट क्लबमध्ये हल्लेखोराने अंदाधुंद गोळीबार केला असून 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर काही जखमी झाले आहेत.   

सोनेश्वर पाटील | Updated: Jan 2, 2025, 12:45 PM IST
24 तासांत अमेरिकेत तिसरा हल्ला, तर न्यूयॉर्कच्या क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार, 11 जणांचा मृत्यू   title=

US Firing: अमेरिकेत 24 तासांत तिसरा मोठा हल्ला. आता एका हल्लेखोराने न्यू यॉर्कमधील क्वीन्स येथील नाईट क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार केला आहे. ज्यामध्ये अनेक लोक जखमी झाले आहेत. ही घटना अमजुरा नाईट क्लबमध्ये काल रात्री म्हणजेच ( 1 जानेवारी ) रोजी रात्री 11.45 च्या सुमारास घडली. 

या हल्ल्यात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तेथील संपूर्ण परिसर सील केला आहे. याआधी बुधवारी अमेरिकेतील न्यू ऑर्लीन्स येथे दहशतवादी हल्ला झाला होता. ज्यामध्ये ISIS च्या दहशतवाद्याने कार घुसवून 15 जणांचा बळी घेतला होता.

अमेरिकेतील लास वेगास येथील ट्रम्प यांच्या हॉटेलबाहेर दुसरा हल्ला झाला. यामध्ये सायबर ट्रकमध्ये झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू झाला तर 7 जण जखमी झाले आहेत. यानंतर अमेरिकेतील होनोलुलु येथे झालेल्या स्फोटात 3 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. आता न्यूयॉर्कमध्ये घडलेली ही चौथी मोठी घटना आहे. रिपोर्टनुसार, ही गोळीबाराची घटना क्वीन्समधील अमजुरा नाईट क्लबमध्ये घडली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी रोजी रात्री हा गोळीबार झाला आहे. तपासाशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबारात जखमी झालेल्या तीन जणांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या अमेरिकन पोलिस अजूनही स्फोटाचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिकन मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांना संशय आहे की हा देखील एक दहशतवादी हल्ला असू शकतो. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. संपूर्ण तपास झाल्यानंतर याबाबतची अधिक माहिती समोर येईल. 

जो बिडेन यांच्याकडून मदत 

ट्रम्प यांच्या हॉटेलबाहेर झालेल्या स्फोटानंतर राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांना या स्फोटाची माहिती देण्यात आली. जो बिडेन यांनी तपासात आवश्यक असल्यास सर्व मदत देऊ असं म्हटलं आहे. व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, जो बिडेन यांनी आपल्या संघाला आवश्यक असलेली कोणतीही मदत देण्यास सांगितले आहे.