Sameer Wankhede on Aaryan Khan Arrest : बॉलिवूडचा किंग शाहरु खानचा मुलगा आर्यन खानला 2021 मध्ये अटक करण्यात आली होती. 25 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर आर्यनला जामीन मिळाला होता. त्यानंतर आर्यनवर असलेल्या सगळ्या आरोपातून त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. यानंतर शाहरुख खान आणि समीर वानखेडे यांच्यातील चॅट लीक झाले होते. आता समीर वानखेडे यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत या संपूर्ण प्रकरणाविषयी सांगितलं. त्याशिवाय त्यांनी सांगितलं की त्यांनी हे चॅट लीक केले नव्हते.
NEWJ शी बोलताना समीर यांना विचारण्यात आलं की त्यावेळी खरंच शाहरुख खानच्या मुलाला अटक करण्यासाठी त्यांना टार्गेट करण्यात आलं होतं? त्यावर उत्तर देत समीर वानखेडे म्हणाले, मी असं म्हणणार नाही की मला टार्गेट करण्यात आलं आहे. पण मी हे सांगेन की मी भाग्यवान व्यक्ती आहे कारण मला मिडिल क्लास लोकांकडून प्रेम मिळालं, जे इतके भाग्यवान नाहीत. जे झालं ते बरं झालं असं मी अनेकदा विचार करतो. त्याचं कारण म्हणजे त्यामुळे मला खूप प्रेम मिळालं. त्यांना या गोष्टीची जाणीव झाली की कोणी कितीही मोठं झालं तरी सगळ्यांसाठी नियम हे समान असायला हवेत. त्यामुळे मला कोणत्याही प्रकारचा पश्चाताप नाही. जर मला पुन्हा अशी संधी मिळाली तर मी हे पून्हा करेन.
समीर वानखेडे यांना जेव्हा शाहरुख खानच्या चॅटविषयी विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी या प्रश्नावर उत्तर दिलं नाही. त्यांनी सांगितलं की त्यांना या विषयी काही बोलायतं नाही. त्याचं कारण म्हणजे कोर्टानं त्यांना एक एफिडेव्हिट दिलं आहे, त्यामुळे तो काही बोलू शकत नाही. खरंतर, त्यांनी स्पष्ट केलं की त्यांनी शाहरुख खानचे चॅट्स लीक केले नाही. त्यांनी सांगितलं की "मी चॅट्स लीक करण्याइतका कमकुवत नाही." जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की शाहरुख खान आणि आर्यन खान पीडित दिसावे म्हणून चॅट्स लीक करण्यात आले. यावर समीर म्हणाले की, ज्याने हे सर्व केलं त्याला मी आणखी प्रयत्न करायला सांगेन.
समीर यांना पुढे विचारण्यात आलं की 'त्यांच्या टीमनं आर्यन खानला त्रास दिला. तर दुसरीकडे मीडियानं त्याला एक लहान मुलगा म्हणून सगळ्यांसमोर दाखवलं. त्यावर समीर म्हणाले, मला वाटत नाही की मी कोणत्या लहान मुलाला अटक केलं होतं. 23 वर्षाच्या वयात भगत सिंग यांनी देशासाठी त्यांचा जीव देला. तुम्ही त्यांना लहान मुलगा म्हणत नाहीत.'